Thackeray Vs Thackeray : राज्यात लोकसभा निवडणूक प्रचार ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ म्हणून गाजणार!

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा दिला त्याचवेळी त्यांना आपल्यावर विरोधी पक्षांकडून टीका होणार याचा अंदाज आला असावा. त्यामुळेच त्यांनी काल गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील भाषणात ‘उद्या अजून जर समोरच्यांची पक-पक सुरू झाली तर मी माझ्या तोंडाची दारे-खिडक्या उघड्या करायला मोकळा आहे’, असा गर्भित इशाराच दिला.

118
Thackeray Vs Thackeray : राज्यात लोकसभा निवडणूक प्रचार ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ म्हणून गाजणार!
  • सुजित महामुलकर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादीच्या महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून त्यांच्यावर अपेक्षेप्रमाणे टीका सुरू झाली. या टीकेला राज यांच्याकडून जशास तसे उत्तर मिळणार हे नक्की. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक भाजपा विरुद्ध काँग्रेस यापेक्षा शिवसेना उबाठा विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) अशी ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ अशीच होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. (Thackeray Vs Thackeray)

गर्भित इशारा

राज ठाकरे यांनी महायुतीला पाठींबा दिला त्याचवेळी त्यांना आपल्यावर विरोधी पक्षांकडून टीका होणार याचा अंदाज आला असावा. त्यामुळेच त्यांनी काल गुढी पाडव्याच्या मेळाव्यातील भाषणात ‘उद्या अजून जर समोरच्यांची पक-पक सुरू झाली तर मी माझ्या तोंडाची दारे-खिडक्या उघड्या करायला मोकळा आहे’, असा गर्भित इशाराच दिला. (Thackeray Vs Thackeray)

काही तासातच सुरुवात

याशिवाय राज यांनी महाराष्ट्रभर तुम्हाला भेटण्यासाठी लवकरच येणार आहे, असे सांगत मनसे या निवडणुकीत राज्यभर सभा घेण्याच्या तयारीत असल्याचा संदेश कार्यकर्त्याना दिला. त्यामुळे शिवसेना उबाठा आणि मनसे यांच्यातील टीका-टिप्पणी, आरोप-प्रत्यारोप यावरच ही निवडणूक गाजणार, असे चित्र सध्या दिसत आहे आणि याची सुरुवात काही तासातच झाली. (Thackeray Vs Thackeray)

रात्री पाठींबा, सकाळी टार्गेट

मंगळवारी रात्री ८.३० वाजता राज यांनी महायुतीला पाठिंब्याची घोषणा केली आणि सकाळीच त्यांना उबाठाकडून टार्गेट केले गेले. ठाकरे यांनी ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी’ महायुतीला पाठींबा देत असल्याचे सांगितले. त्यावर बुधवारी सकाळी शिवसेना उबाठा गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘नमोनिर्माण’ पक्ष कसा झाला? अशा शब्दात टीका केली. (Thackeray Vs Thackeray)

(हेही वाचा – Narendra Modi Ramtek : इंडि आघाडीवाले हिंदु धर्माच्या शक्तीलाही संपवू पहात आहेत; पंतप्रधानांनी उघड केली काँग्रेसची पापे)

नमोनिर्माण पक्ष कसा झाला?

राऊत म्हणाले, “महाराष्ट्राच्या स्वाभिमानसाठी निर्माण झालेला एक पक्ष महाराष्ट्राच्या शत्रूना पाठींबा देत असेल तर लोकांच्या मनात प्रश्न निर्माण होतील. त्याची उत्तरे त्यांनी दिली पाहिजेत. असं काय झालं की तुम्हाला महाराष्ट्राच्या शत्रूंना पाठींबा द्यावा वाटला. तुमचं नमोनिर्माण पक्ष कसा झाला? नमोनिर्माण होण्याची गरज का पडली?” असा सवालही राऊत यांनी केला. (Thackeray Vs Thackeray)

उत्तर मिळणारच

आता राऊत बोलले तर त्याला मनसे नेते संदीप देशपांडे उत्तर देतीलच आणि उद्धव ठाकरे निवडणूक प्रचारात टीका करतील, त्याला स्वतः राज ठाकरे सभांमधून खडेबोल सुनावतील, हे गणित वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळे ही निवडणूक ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ अशीच होण्याची शक्यता अधिक आहे. (Thackeray Vs Thackeray)

पक्षाला संधी

मनसेने एकूणच ही निवडणूक गंभीरतेने घेतल्याचे दिसत असून या निमित्ताने पक्ष आणि पक्षाची धोरणे ग्रामीण भागापर्यंत पोहोचविण्याची संधी पक्षाला मिळाली आहे. पक्ष बांधणी, विधानसभेसाठी उमेदवारांची चाचपणी, पक्षाला सामान्य लोकांकडून मिळणारा प्रतिसाद, जनतेच्या पक्षाकडून अपेक्षा याचा अभ्यास करण्याचा पक्षाचा मानस असल्याचे बोलले जात आहे. (Thackeray Vs Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.