मुंबई महापालिकेत काँग्रेसने शिवसेनेला टाकले मागे

95

मुंबईत शिवसेना पक्ष सत्तेवर आहे आणि भाजप पहारेकरी म्हणून भूमिका निभावत आहेत. असे असले तरी महापालिकेतील विरोधी पक्ष असलेला काँग्रेस प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात पहिल्या क्रमांकावर आहे. प्रजा फाऊंडेशनने केलेल्या महापालिकेतील पक्षांच्या मूल्यमापन अहवालात काँग्रेसला पहिला क्रमांक मिळाला आहे. महापालिकेत २८ नगरसेवक असलेल्या काँग्रेसला प्रजाने ५७.२१ टक्के एवढे गुण दिले आहेत. मात्र, सर्वाधिक म्हणजे ९२ नगरसेवक असलेल्या शिवसेनेला दुसरा क्रमांक मिळाला आहे. मागील वर्षीही शिवसेना दुसऱ्या क्रमांकावरच होते. त्यामुळे स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसने महापालिकेत अव्वल क्रमांक मिळत शिवसेनेला मागे टाकले आहे.

असे आहे प्रगती पुस्तक

मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करताना प्रजा फाऊंडेशनने महापालिकेतील राजकीय पक्षांच्या कामांचेही प्रगती पुस्तक बनवले आहे. या प्रगती पुस्तकात सत्ताधारी शिवसेना पक्षाला दुसऱ्या क्रमांकावर टाकून काँग्रेस पक्षाने पहिला क्रमांक मिळवला आहे. तर पहारेकरी असलेला भाजप पक्ष चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे. तिसऱ्या स्थानावर ६ नगरसेवक असलेल्या समाजवादी पक्षाने मजल मारली आहे. तर आठ नगरसेवक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला शेवटून पहिला क्रमांक मिळवता आलेला आहे.

(हेही वाचाः विरोधी पक्षनेते रवी राजा ठरले मुंबईतील सर्वोत्तम नगरसेवक)

नगरसेवकांच्या कामांचा स्तर खालावतोय

प्रजाच्या अहवालामध्ये २२० नगरसेवकांच्या कामांचे मूल्यमापन करण्यात आले होते. यामध्ये त्यांनी ३२.९७ टक्के एवढे गुण दिले आहेत. परंतु २०२० मध्ये २२० नगरसेवकांचे मूल्यमापन करण्यात आले होते. त्यामध्ये त्या सर्वांना एकूण ४३.२८ टक्के एवढे गुण दिले होते. २०१९ मध्ये २१९ नगरसेवकांना ४३.६५ टक्के गुण दिले होते आणि २०१८ मध्ये २१५ नगरसेवकांच्या अभ्यासानंतर त्यांना ४३.२९ टक्के एवढे गुण दिले होते. त्यामुळे मागील तीन वर्षांमध्ये सरासरी ४३ टक्के गुण मिळवणाऱ्या नगरसेवकांमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. उलट त्यांच्या गुणांची टक्केवारी खालावत चक्क दहा टक्क्यांनी कमी होऊन ३२.९७ टक्के एवढी झाली आहे.

(हेही वाचाः शिवसेना नेत्यांना पडला प्रश्न… बाळासाहेब की माँसाहेब?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.