मुंबई महापालिका निवडणुकीत नवाब मलिकांचे नेतृत्व असलेल्या राष्ट्रवादीबरोबर आमचे देणे-घेणे नाही; Amit Satam यांची आक्रमक भूमिका

जागा वाटपाबाबत बोलताना अमित साटम (Amit Satam) म्हणाले, आमच्या समोर किती जण किती जागा लढणार हा प्रश्न नाही, तर मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणे हे महत्त्वाचे आहे.

143

मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्याकडे नेतृत्व सोपवले आहे. जे भाजपाला अमान्य आहे. मलिकांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंदवले आहेत. त्यातून त्यांची अजूनही निर्दोष सुटका झाली नाही. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने मलिकांना नेतृत्व सोपवले आहे. म्हणून राष्ट्रवादीशी भाजपाला काहीही देणे घेणे नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आमदार अमित साटम (Amit Satam)  यांनी पत्रकार परिषदेत मांडली.

या पत्रकार परिषदेत शिवसेनेकडून मंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी बोलताना अमित साटम म्हणाले, जर राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नेत्रत्व बदल केला आणि नवाब मलिकांच्या ऐवजी दुसऱ्याला नेतृत्व सोपवले तर भाजप राष्ट्रवादीच्या सोबत युती करण्याचा विचार करेल, असेही साटम (Amit Satam) म्हणाले.

(हेही वाचा इकडे सुरु आहे अधिवेशन संसदेचे; जर्मनीत मौजमजा करणारे Rahul Gandhi म्हणतात जणू ‘मला काय त्याचे’)

जागा वाटपाबाबत बोलताना अमित साटम (Amit Satam) म्हणाले, आमच्या समोर किती जण किती जागा लढणार हा प्रश्न नाही, तर मुंबईकरांच्या सोयीसाठी मुंबई महापालिकेची सत्ता मिळवणे हे महत्त्वाचे आहे. ज्यांनी मुंबई महापालिका म्हणजे आपल्या कुटुंबाची जहागीर आहे, असे वाटते त्यांना मुंबई महापालिकेच्या हातून ताब्यात घेणे हे महत्त्वाचे आहे, असे साटम म्हणाले. मुंबईत मेट्रो रेल्वे, कोस्टल रोड, अटल सेतू इत्यादी कुणी आणले हे आम्ही मुंबईकरांना सांगणार आहोत, असेही अमित साटम (Amit Satam) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.