Pakistan Election : तुरुंगात असूनही इम्रान खानच्याच पक्षाचा पाकिस्तानच्या निवडणुकीत बोलबाला; पीटीआय पक्षाने जिंकल्या सर्वाधिक जागा 

260

पाकिस्तानमध्ये नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय निवडणुकांसाठी (Pakistan Election) मतदान संपल्यानंतर निकाल येत आहेत. निवडणूक आयोगाने १८ तासांच्या विलंबानंतर अधिकृत निकाल जाहीर करण्यास सुरुवात केली. दरम्यान, पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वासह अनेक प्रांतांमध्ये हिंसाचार पसरला आहे. जेलमध्ये असलेल्या इम्रान यांच्या च्या पीटीआय पक्षाचाच बोलबाला दिसून येत आहे. या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मात्र या पक्षाने अनेक जागांवर हेराफेरीचा आरोप होत आहे.

१३४ जागांवर बहुमत असणे आवश्यक

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीच्या एकूण ३३६ जागा आहेत. त्यापैकी २६५ जागांवर निवडणूक (Pakistan Election) झाली. एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. उर्वरित जागा राखीव आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी १३४ जागांवर बहुमत असणे आवश्यक आहे. पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने ३ पक्षांमध्ये स्पर्धा आहे. यामध्ये पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N), पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (PTI) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (PPP) यांचा समावेश आहे.

(हेही वाचा : Uttarakhand UCC : समान नागरी कायद्याच्या विरोधात उत्तराखंडात ‘शाहीन बाग’ची पुनरावृत्ती होणार?)

अपेक्षांचे महत्व वाढले 

निवडणुकीचे (Pakistan Election) निकाल जाहीर झाल्यावर इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाने ९९ जागा जिंकल्या, नवाझ शरीफ यांच्या पीएमएल-एन पक्षाने ७१ जागा जिंकल्या तर पीपीपी पक्षाने ५३ जागा जिंकल्या आहेत. तर अन्य २७ जागा जिंकल्या आहेत. बहुमतासाठी १३४ जागांची आवश्यकता आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यावर आता कोणी एक पक्ष सरकार स्थापन करू शकणार आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.