Rahul Gandhi उबाठाला अडचणीत आणणार?

सावरकरप्रेमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात येऊन गांधी यांनी सावरकरांबाबत अपशब्द उच्चारल्यास भाजपा आणि शिवसेनेला (शिंदे) काँग्रेस आणि महाविकास आघाडीविरुद्ध लोकसभा निवडणूक प्रचारात रान पेटवण्याची आयती संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

214
Rahul Gandhi पंतप्रधान पदाचे उमेदवार? Shiv Sena UBT ची अप्रत्यक्ष कबुली

स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्यासाठी प्रसिद्ध असणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची (Gandhi) उद्या रविवारी १७ मार्चला छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जाहीर सभा होणार असून या सभेवर ‘शिवतीर्थ’ म्हणजेच राज ठाकरे यांच्या मनसेचे बारीक लक्ष असणार आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उबाठाचीही धास्ती वाढली असून गांधी (Gandhi) यांनी सावरकर (Savarkar) यांच्यावर टीका केल्यास उबाठाच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे आहेत. (Rahul Gandhi)

सावरकरद्वेष उफाळून आल्यास उबाठाची मोठी गोची

स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांना माफीवीर म्हणून हिनवणाऱ्या राहुल गांधी (Gandhi) यांची रविवारी सावरकर (Savarkar) राष्ट्रीय स्मारकाच्या समोरच सभा होणार आहे. या सभेला गांधी (Gandhi) यांचा सावरकरद्वेष उफाळून आल्यास उबाठाची मोठी गोची होणार, यात शंका नाही. सावरकरप्रेमी (Savarkar) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात येऊन गांधी (Gandhi) यांनी सावरकरांबाबत (Savarkar) अपशब्द उच्चारल्यास भाजपा आणि शिवसेनेला (शिंदे) काँग्रेस आणि महाविकास आघाडीविरुद्ध लोकसभा निवडणूक प्रचारात रान पेटवण्याची आयती संधी मिळणार असल्याचे बोलले जात आहे. (Rahul Gandhi)

(हेही वाचा – Ajit Pawar : बारामतीतील सोमेश्वरनगर येथे १०० खाटांच्या आरोग्य पथकासाठी ७७ कोटी ७९ लाखांचा निधी मंजूर)

…तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही

एकीकडे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांना इशारा दिला होता की सावरकर (Savarkar) यांचा गांधी (Gandhi) यांनी अपमान केल्यास त्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज मैदानाजवळच राज ठाकरे यांचे ‘शिवतीर्थ’ हे निवासस्थान आहे. यामुळे मनसे या सभेवर बारीक लक्ष ठेऊन आहेच, त्याचप्रमाणे उबाठानेही या विषयाची धास्ती घेतली असल्याचे समजते. (Rahul Gandhi)

सावरकरांवरील टीका टाळणार?

स्वातंत्र्यवीर सावरकर (Savarkar) यांना माफीवीर म्हणून संबोधणारे राहुल गांधी (Gandhi) उद्या रविवारी माफी मागतात की पुन्हा सावरकर (Savarkar) यांच्यावर टीका करतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र, राहुल गांधी (Gandhi) हे रविवारी त्यांच्या भाषणात सावरकर (Savarkar) यांचा उल्लेख टाळतील, अशी शक्यता उबाठाकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Rahul Gandhi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.