Nitish Kumar : इंडी आघाडीला बसणार जबरदस्त धक्का; नितीशकुमार रालोआच्या वाटेवर?

भाजप नेते गुप्तपणे सुशासनबाबूच्या संपर्कात

184
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार

लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) शंखनाद होण्यापूर्वी विरोधी गटातील दिग्गज नेत्यांना रालोआत आणण्याच्या योजनेवर भारतीय जनता पक्ष काम करीत आहे. भाजप नेते अन्य पक्षांतील नेत्यांशी नियमित संपर्कात असून या कामात कमालिची गुप्तता पाळली जात आहे, हे येथे उल्लेखनीय. (Nitish Kumar)

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेत्यांचा खरा डोळा आहे तो बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यावर. लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections) कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वी त्यांना रालोआत आणण्याचा भाजपची योजना आहे. याशिवाय, बॉलिवूड आणि क्रीडा क्षेत्रातील नामवंत शंभर लोकांना पक्षात आणण्याच्या योजनेवर काम सुरू आहे. (Nitish Kumar)

महत्वाचे म्हणजे, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी ‘इंडी’ आघाडीचे पद नाकारल्यामुळे भाजपच्या आशांना पंख फुटले आहेत. नितीशकुमार (Nitish Kumar) केवळ कॉंग्रेसवर (Congress) नाराज आहेत असे नव्हे तर लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलावर सुध्दा नाराज आहेत. यामुळे नितीशकुमार (Nitish Kumar) रालोआत येऊ शकतात असे भाजपला (BJP) वाटते. (Nitish Kumar)

(हेही वाचा – Indo-Pak T20 World Cup Tie : टी-२० विश्वचषकातील भारत-पाक सामना आणि न्यूयॉर्कमधील स्टेडिअम यांची इतकी चर्चा का होतेय?)

भाजपचे दिग्गज नेते नितीशकुमारांच्या गुप्तपणे संपर्कात

मुळात, नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करावे, अशी लालू प्रसाद यादव यांची इच्छा आहे. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी आता बिहार सोडून राष्ट्रीय राजकारण भूमिका निभवावी असे राजदचे म्हणणे आहे. नितीशकुमार यांना मात्र मुख्यमंत्रीपदावर राहून राष्ट्रीय राजकारणात सक्रीय रहायचे आहे. लालू प्रसाद यादव यांचा या गोष्टीला विरोध आहे. (Nitish Kumar)

जेडीयू आणि राजद यांच्यात निर्माण झालेली दरी आणि इंडी आघाडीचे नितीशकुमार यांनी सोडलेले संयोजक पद भाजपच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत. भाजपच्या रणनितीकारांनी हीच बाब हेरली असून भाजपचे दिग्गज नेते नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्याशी गुप्तपणे संपर्क साधत असल्याची माहिती आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री विनोद तावडे यांच्या नेतृत्वात विरोधी गटातील दिग्गज नेत्यांना भाजपात आणण्याची रणनिती तयार केली जात आहे. जवळपास पन्नास नेत्यांची भाजपात प्रवेशाची योजना तयार झाली आहे. हे नेते कोणत्याही क्षणी कमळ हातात घेऊ शकतात. (Nitish Kumar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.