“मी सामना आणि मार्मिक वाचत नाही”, राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितले

121

मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंची पनवेलमध्ये जाहीर मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी सध्या सुरू असलेल्या राजकारणावर भूमिका मांडत विरोधकांना टोलाही लगावला. तसेच या संपूर्ण परिस्थितीवर सविस्तर गुढीपाडव्याला बोलेन असे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

( हेही वाचा : होळी, धुलिवंदनासाठी मुंबई पोलिसांची नियमावली! पालन न केल्यास होणार कारवाई )

“मी सामना आणि मार्मिक वाचत नाही”

या मुलाखती दरम्यान वृत्तपत्रांचा प्रश्न आल्यावर राज ठाकरे म्हणाले, मार्मिक आणि सामना वाचत नाही माझ्यातकडे दोन्ही वृत्तपत्र येतात पण मी वाचत नाही हल्ली वर्तमानपत्रांमध्ये तशा बातम्या नसतात, चॅनल्सही बघवत नाहीत असे स्पष्टपणे राज ठाकरेंनी यावेळी सांगितले.

विरोधकांना टोला

राज ठाकरेंनी थोडे वाचन करावे अशी टीका करणाऱ्यांविषयी काय वाटते असा प्रश्न यावेळी मुलाखतकारांनी राज ठाकरेंना विचारला यावर हा त्यांच्या अज्ञानाचा भाग आहे मला या गोष्टींचा काहीही फरक पडत नाही असे सांगत राज ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.