Mid Day Meal Scheme : संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली ‘ती’ योजना सरकारने गुंडाळली

गेल्या चार वर्षांत बोगस कामगार दाखवून हजारो कोटी रुपये लाटल्याचे समोर आल्यामुळे १ नोव्हेंबर २०२३ पासून ही योजना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

72
Mid Day Meal Scheme : संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली 'ती' योजना सरकारने गुंडाळली
Mid Day Meal Scheme : संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली 'ती' योजना सरकारने गुंडाळली

भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे संशयाच्या भोवऱ्यात सापडलेली बांधकाम मजुरांसाठीची माध्यान्ह भोजन योजना अखेर गुंडाळण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. गेल्या चार वर्षांत बोगस कामगार दाखवून हजारो कोटी रुपये लाटल्याचे समोर आल्यामुळे १ नोव्हेंबर २०२३ पासून ही योजना बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. (Mid Day Meal Scheme)

इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाला उपकाराच्या माध्यमातून हजारो कोटींचा निधी मिळतो. हा निधी मजुरांच्या कल्याणासाठी खर्च करणे अपेक्षित असते. याचा भाग म्हणून कामगारांना दोन वेळचे सकस भोजन देणारी योजना राबविण्याचा निर्णय फेब्रुवारी २०१९ मध्ये घेण्यात आला. चपाती, भाजी, डाळ, भात, लोणचे, सलाड आणि गूळ अशी थाळी एक रुपयात देणारी ही योजना होती. (Mid Day Meal Scheme)

त्यासाठी मुंबई, नवी मुंबई, औरंगाबाद विभागासाठी ‘मे. गुनिना कमर्शिअल प्रा. लि.’, नाशिक व कोकण विभागांसाठी (मुंबई व नवी मुंबई वगळून) ‘मे. इंडोअलाईड प्रोटीन फुड्स प्रा. लि.’, तर पुणे, अमरावती आणि नागपूर विभागांसाठी ‘मे. पारसमल पगारिया अँड कंपनी’ यांना कंत्राट देण्यात आले होते. (Mid Day Meal Scheme)

सुरुवातीला केवळ नोंदणीकृत कामगारांसाठी असलेली ही योजना करोनाकाळात बिगर नोंदणीकृत, तसेच नाका कामगारांसाठीही खुली करण्यात आली. मात्र विकासक, ठेकेदार आणि माध्यान्ह भोजन पुरवठादारांनी कामगार विभागातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून निधीवर ताव मारल्याचे समोर आले. त्यामुळे आता योजनेतील काम थांबविण्याचे आदेश महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक कुंभार यांनी सबंधित ठेकेदारांना दिले आहेत. (Mid Day Meal Scheme)

(हेही वाचा – Pakistan in World Cup : बांगलादेश विरुद्धच्या विजयानंतर पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठता येईल का?)

बोगस कामगार दाखवून पैसे लाटले
  • अनेक जिल्ह्यांत कामागारांची संख्या कमी असताना केवळ कागदोपत्री कामगार दाखवून कोट्यवधी रुपये उकळल्याचे समोर आले. (Mid Day Meal Scheme)
  • विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटल्यानंतर कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी कामगार आयुक्तांमार्फत चौकशीची घोषणा केली. (Mid Day Meal Scheme)
  • योजनेच्या अंमलबजावणीत वित्तीय आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचे या चौकशीत आढळून आले आहे. (Mid Day Meal Scheme)
  • योजनेबाबत अद्यापही अनेक तक्रारी येत असल्याचे समोर आल्यानंतर योजनाच गुंडाळण्यात आली आहे. (Mid Day Meal Scheme)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.