पडळकरांना आझाद मैदानातच होणार अटक? 

92

सांगली जिल्हा बँक निवडणुकीत जो राडा झाला होता. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. म्हणून आमदार पडळकर यांनी अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. जिल्हा सत्र न्यायाधीश आर.व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे पडळकर सध्या एसटी कर्मचाऱ्यांसोबत आझाद मैदानात आंदोलनाला बसले आहेत. त्या ठिकाणीच त्यांना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे प्रकरण? 

सांगली जिल्हा बँक निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आले. त्या प्रकरणात 10 जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली. आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची आलीशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटकपूर्व जामीन अर्जासाठी धाव घेतली. त्यावर सुनावणी पार पडली. तो अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

(हेही वाचा देशातील ‘ते’ तिन्ही कृषी कायदे रद्द करणार! पंतप्रधानांची मोठी घोषणा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.