Israel Hamas Conflict: इस्रायलमध्ये गुगलचे ‘लाईव्ह ट्रॅफिक अॅप’ बंद, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग युद्धविरामाबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर

इस्रायली सैन्याच्या हालचाली आणि मोहिमांचा मागोवा 'गुगल मॅप'सारख्या गुगल नेव्हिगेशन अॅप्सद्वारे घेतला जाऊ शकतो.

150
Israel Hamas Conflict: इस्रायलमध्ये गुगलचे 'लाईव्ह ट्रॅफिक अॅप' बंद, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग युद्धविरामाबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर
Israel Hamas Conflict: इस्रायलमध्ये गुगलचे 'लाईव्ह ट्रॅफिक अॅप' बंद, राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग युद्धविरामाबाबत काय म्हणाले? वाचा सविस्तर

युद्धबंदीच्या मागणीदरम्यान (Israel Hamas Conflict) गाझा पट्टीवर इस्रायलचे हल्ले सुरूच आहेत. इस्रायली सैन्याने मंगळवारी दक्षिण गाझामध्ये हवाई हल्ले केले, या हल्ल्यात किमान २८ पॅलेस्टिनी ठार झाले. इस्रायली सैनिकांचे म्हणणे आहे की, इस्रायली सैन्याच्या हालचाली आणि मोहिमांचा मागोवा ‘गुगल मॅप’सारख्या गुगल नेव्हिगेशन अॅप्सद्वारे घेतला जाऊ शकतो.

सध्या इस्रायलमधील लोकांना गुगल नेव्हिगेशन अॅप वापरण्यात अडचणी येत आहेत. गुगलने इस्रायलमधील लाइव्ह ट्रॅफिक अॅप बंद केले आहे. इस्रायली लष्कराच्या विनंतीवरून गुगलने हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती देण्यात येत आहे.

(हेही वाचा – Maratha Reservation: मराठा, धनगर आरक्षणाबाबत उदयनराजेंनी घेतली पंतप्रधानांची भेट)

याबाबत इस्रायली सैनिकांचे म्हणणे आहे की, इस्रायली सैन्याच्या हालचाली आणि मोहिमांचा मागोवा गुगल मॅप नेव्हिगेशन अॅपद्वारे घेतला जाऊ शकतो. उत्तर गाझामधील शेवटच्या कार्यरत रुग्णालयांपैकी एका रुग्णालयावर हल्ला केला. हमासच्या बाजूने असलेल्या येमेनच्या इराण समर्थित हौथी बंडखोरांनी लाल समुद्रात हल्ले सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले आहे. याचा परिणाम आंतरराष्ट्रीय व्यापारावर होणार आहे.

युद्धविरामासाठी प्रयत्न सुरू
इस्रायलचे राष्ट्रपती इसहाक हर्जोग यांनी मंगळवारी, १९ डिसेंबरला हमासने ओलिस ठेवलेल्यांना सोडवण्याकरिता युद्धबंदीची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही युद्धबंदी कराराकरिता तयार आहोत. त्यामुळे संरक्षण सचिव लॉयड्स यांनी हमासविरुद्धच्या मोठ्या लढाऊ मोहिमा कमी करण्यासाठी इस्रायली लष्करी नेत्यांशी चर्चा केली, असल्याचे त्यांनी सांगितले.

…तोपर्यंत युद्ध संपणार नाही
इस्रायलचे काही सहकारी देश फ्रान्स, ब्रिटन आणि जर्मनीनेही युद्धबंदीसाठी दबाव वाढवला आहे. याबाबत इस्रायलला अचूक कारवाई करण्याचे आवाहन केले आहे. याबाबत इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, हमास उर्वरित १२९ ओलिसांची सुटका करेपर्यंत युद्ध संपणार नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.