सोनिया गांधींच्या औषधोपचारासाठी एमएफ हुसेनचे पेंटिंग खरेदी करण्यास गांधी कुटुंबाने टाकलेला दबाव

118

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर न्यूयॉर्क येथे औषधोपचार करण्यासाठी गांधी कुटुंबाने येस बँकेचे सह-संस्थापक राणा कपूर यांच्यावर प्रियंका गांधी वाड्रा यांनी त्यांच्याकडील एम एफ हुसेन यांनी काढलेले चित्र विकत घ्यावे, यासाठी गांधी घराण्याकडून दबाव टाकण्यात आला होता, अशी कबुली स्वतः राणा कपूर यांनी ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाकडे दिली.

न्यूयॉर्क येथील विशेष न्यायालयात फेडरल अँटी मनी लाँडरिंग एजन्सीने दाखल केलेल्या आरोपपत्रात कपूर यांनी हा खुलासा केला आहे. मार्च 2020 मध्ये या प्रकरणात अटक झाल्यानंतर राणा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर, त्यांचे कुटुंब, दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (DHFL) चे प्रवर्तक कपिल आणि धीरज वाधवन आणि इतरांविरुद्ध येथील ईडीच्या विशेष न्यायालयात नुकतेच दुसरे पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यात हा गौप्यस्फोट करण्यात आला.

गांधी घराण्याला मदत मिळायचे पद्मभूषण

तत्कालीन पेट्रोलियम मंत्री मुरली देवरा यांनी सांगितले की, एमएफ हुसेन यांचे पेंटिंग विकत घेण्यास त्यांनी नकार दिला, तर त्यांना न केवळ गांधी घराण्याशीश संबंध गमवावे लागणार, तर त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्कारही मिळणार नाही, असे कपूर म्हणाले. हे वृत्त इंडियन एकस्प्रेसने दिले आहे.

गांधी कुटुंबाशी वैर नको म्हणून दिले २ कोटी

सोनिया गांधींचे जवळचे विश्वासू अहमद पटेल यांनी त्यांना सांगितले होते की, सोनिया गांधींच्या वैद्यकीय उपचारासाठी योग्य वेळी गांधी कुटुंबाला मदत करून कपूर कुटुंबाने चांगले काम केले आहे आणि त्यामुळे त्यांचा ‘पद्मभूषण’ पुरस्कारासाठी योग्य विचार केला जाईल. खरेतर मी हे चित्र खरेदी करण्यास तयार नव्हतो, असेही कपूर म्हणाले. तरीही गांधी कुटुंबासारख्या बलाढ्य घराण्याशी शत्रुत्व परवडणारे नाही म्हणून आपण शेवटी आपण २ कोटी रुपये दिले, असेही ते म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.