India-Canada Row : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार हिंसाचारापर्यंत करू नये; जयशंकर यांची स्पष्टोक्ती 

आमच्या दूतावासावर स्मोक बॉम्ब फेकण्यात आले. आमच्या सल्लागारांसमोर हिंसाचार झाला. लोकांना लक्ष्य करून धमक्या देण्यात आल्या. काही लोकांबाबत पोस्टर लावण्यात आले. मला ठाऊक नाही की मी यासाठी स्टँडऑफ हा शब्द वापरेन की नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर वॉशिंग्टनमध्ये भारतीय पत्रकारांशी बोलताना म्हणाले. 

101
India-Canada Row : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार हिंसाचारापर्यंत करू नये; जयशंकर यांची स्पष्टोक्ती 
India-Canada Row : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार हिंसाचारापर्यंत करू नये; जयशंकर यांची स्पष्टोक्ती 

भारत आणि कॅनडा यांचे संबंध सध्या तणावपूर्ण बनले आहेत. (India-Canada Row) दरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. आमच्या दूतावासावर स्मोक बॉम्ब फेकण्यात आले. आमच्या सल्लागारांसमोर हिंसाचार झाला. लोकांना लक्ष्य करून धमक्या देण्यात आल्या. काही लोकांबाबत पोस्टर लावण्यात आले. भारताचा मुद्दा हा  हिंसाचार आहे आणि असे वातावरण आहे, असे उद्गार भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी काढले. अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले जयशंकर शुक्रवारी वॉशिंग्टन डीसी येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे. (India-Canada Row)

(हेही वाचा – Gas Pipelines : घरांना गॅस पाईपलाईन पुरवठा करणारं ‘हे’ ठरलं पहिलं गाव, जाणून घ्या)

परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर, भारतीय मुत्सद्दी आणि मिशन्सच्या विरोधात हिंसाचार आणि धमकावण्याचा संदर्भ देत म्हणाले की, कॅनडातील सध्याची परिस्थिती सामान्य मानली जाऊ नये आणि भारताला भाषण स्वातंत्र्याच्या संकल्पनेवर इतरांकडून धडे घेण्याची आवश्यकता नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विस्तार हिंसाचार भडकावण्यापर्यंत करू नये. आमच्यासाठी तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गैरवापर आहे, ते स्वातंत्र्याचे संरक्षण नाही.” (India-Canada Row)

भारत आणि कॅनडा यांच्यात या समस्येचे निराकरण करण्यासाठी  स्टँडऑफ आहे का, असा प्रश्न विचारला परराष्ट्रमंत्री म्हणाले की, ‘मला ठाऊक नाही की, मी यासाठी स्टँडऑफ हा शब्द वापरेन की नाही.’ अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मुत्सद्दींना धमकावणे मान्य नाही. अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दल आम्हाला इतरांकडून शिकण्याची गरज नाही, असे एस जयशंकर पुढे म्हणाले. (India-Canada Row)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.