Exit polls: एक्झिट पोल कधी जाहीर होणार? वाचा सविस्तर

240
Exit polls: एक्झिट पोल कधी जाहीर होणार? वाचा सविस्तर
Exit polls: एक्झिट पोल कधी जाहीर होणार? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणूक 2024 चा (Exit polls) अंतिम टप्पा 1 जून रोजी पूर्ण होणार आहे. हा टप्पा पार पडताच लोकसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया संपणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी लोकसभेचा निकाल येणार आहे. या निवडणुकीत कुणाला बहुमत मिळेल? कुणाची सत्ता येईल? कोण सत्तेबाहेर राहील? हे स्पष्ट होणार आहे. 4 जून रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत हे चित्र स्पष्ट होणार आहे. अधिकच अटीतटीची लढत झाली तर दुसऱ्या दिवशी पहाटेही निवडणूक निकाल जाहीर होऊ शकतो. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग येईल. (Exit polls)

(हेही वाचा –Devendra Fadanvis: आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार!)

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागणार असला तरी एक्झिट पोल आधीच जाहीर होणार आहेत. 1 जून रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यावर त्याच दिवशी एक्झिट पोल (Exit polls) जाहीर होतील. साधारण संध्याकाळी 7 च्या आसपास हे एक्झिट पोल जाहीर होतील. विविध न्यूज चॅनल्स आणि रिसर्च एजन्सींकडून हे एक्झिट पोल जाहीर केले जातात. एक्झिट पोल हे केवळ निवडणूक निकालाचा अंदाज असतात. अनेकदा एक्झिट पोल बऱ्यापैकी योग्यही ठरतात, काही वेळा तंतोतंत खरेही ठरतात तर काही वेळा एक्झिट पोल खोटेही ठरत असतात. (Exit polls)

(हेही वाचा –Khalsa College भ्रष्टाचार प्रकरणाचा निकाल कधी येणार?)

सर्वेक्षण एजन्सी मतदानानंतर मतदारांचा अभिप्राय गोळा करून एक्झिट पोल आयोजित करतात, या डेटाचा वापर करून निकालांचा अंदाज लावतात. भारत निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेदरम्यान एक्झिट पोल आयोजित करण्यास मनाई केली असली तरी , शेवटचे मतदान झाल्यानंतर 30 मिनिटांनंतर त्यांचे प्रकाशन करण्याची परवानगी आहे. (Exit polls)

दोन राज्यांचा निकाल आधी

लोकसभेसोबतच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. त्याचे निकाल 2 जून रोजी लागणार आहेत. तर ओडिशा आणि आंध्रप्रदेश विधानसभेचे निकाल 4 जून रोजी लागणार आहेत. (Exit polls)

निकाल कुठे पहावा?

(https://www.eci.gov.in/) या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहू शकता. (Exit polls)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.