Devendra Fadanvis: आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार!

215
Devendra Fadanvis: आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार!
Devendra Fadanvis: आव्हाडांनी केलेल्या कृत्याचा देवेंद्र फडणवीसांनी घेतला समाचार!

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) वाराणसी दौऱ्यावर असून उत्तर प्रदेशात 7 व्या आणि अंतिम टप्प्यातील प्रचारासाठी ते पोहोचले आहेत. काशी येथे काशी-महाराष्ट्र समागम कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील पुणे अपघात आणि मनुस्मृती व जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही भाष्य केले. “आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केलेला अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही”, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. (Devendra Fadanvis)

(हेही वाचा –BoycottBollywood: बॉयकॉट बॉलीवूड पुन्हा ट्रेंडिंग का?)

शालेय अभ्यासक्रमातील मनुस्मृती श्लोकाच्या सहभागावरही फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्टपणे सांगितले. “दरम्यान, मी काशीत प्रचाराला नाही तर लोकांचा उत्साह पाहायला आलो आहे. काशी येथे आपण प्रचाराला आलेलो नाही, त्याची गरज सुद्धा नाही. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिग्विजयात मराठी माणसाचा इतका मोठा सहभाग आहे, याचा मला आनंद आहे.” असेही फडणवीसांनी काशीतून बोलताना म्हटले. (Devendra Fadanvis)

शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीच्या श्लोकाबाबत फडणवीस स्पष्टच बोलले

कुठल्याही अभ्यासक्रमात कुठेही मनुस्मृतीचा श्लोक घेण्याचा विचारदेखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी केलेला नाही, कधीही आलेला नाही, त्यासंदर्भात कुठलीही चर्चा नाही, असे म्हणत फडणवीसांनी (Devendra Fadanvis) स्पष्ट केली. तसेच, त्यांनीच ही चर्चा आणली, त्यांनीच आंदोलन केले आणि जेव्हा खोटं आंदोलन करताना माणूस कसं काम करतो, हे आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो त्यांनी फाडला. पण, महाराष्ट्र हे कदापि सहन करणार नाही. असेही फडणवीस यांनी म्हटले. (Devendra Fadanvis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.