Election Commission of India : निवडणूक आयोगाचा दणका; मुंबई महापालिका आयुक्त चहल यांना बसला फटका

चहल यांना ८ मे २०२० रोजी मुंबई महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मविआचे सरकार होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

332
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) निवडणुकीची घोषणा करताना ज्या अधिकाऱ्यांना ३ वर्षे पूर्ण झाली असतील त्यांना ताबडतोब हटवा, असे आदेश दिले आहेत. त्याचा फटका मात्र मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांना हटवण्यात आले.
इक्बाल सिंह चहल हे महाराष्ट्र केडरचे १९८९च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी महाराष्ट्र शासन आणि राष्ट्रीय स्तरावर विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. चहल यांनी मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या कोस्टल रोड प्रकल्पात, रुग्णालयाचे अपग्रेडेशन आणि आधुनिकीकरण, नवीन रस्त्यांचे बांधकाम, मुंबईचे सुशोभीकरण आणि स्वच्छता मोहिमांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी चार वर्षे ठाण्याचे जिल्हाधिकारी आणि चार वर्षे औरंगाबादचे जिल्हाधिकारी, तसेच राज्य उत्पादन शुल्क आयुक्त आणि म्हाडाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले.

युती सरकारनेही चहल यांना कायम केलेले 

चहल यांना ८ मे २०२० रोजी मुंबई महापालिका आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी मविआचे सरकार होते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. त्यानंतर ३० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्यात मविआचे सरकार कोसळून त्याठिकाणी भाजपा-शिवसेना युतीचे सरकार आले. त्यानंतरही युती सरकारने चहल यांना आयुक्त पदावर कायम ठेवले. मात्र निवडणूक आयोगाच्या (Election Commission of India)आदेशानंतर चहल यांचा कार्यकाळ ३ वर्षांपेक्षा अधिक झाला असल्यामुळे त्यांना हटवण्यात आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.