Mumbai Crime : बेपत्ता भावंडांचे मृतदेह मनपाच्या पाण्याच्या टाकीत सापडले, वडाळ्यात खळबळ

388
Mumbai Crime : दोन भावंडांच्या मृत्यूप्रकरणी सुपरवायझरवर गुन्हा दाखल
मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporations) निष्काळजीपणामुळे दोन लहान भावंडांचा गार्डनमधील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे. (Mumbai Crime)
दोन्ही भावंडे रविवारी सकाळपासून बेपत्ता होते. सोमवारी दोघांचे मृतदेह वडाळा येथील वन गार्डन येथील उघड्या पाण्याच्या टाकीत आढळून आले आहे. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालय (KEM Hospital) येथे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असून तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
अंकुश मनोज वाघरी (५ वर्षे ४ महिने) आणि अर्जुन मनोज वाघरी (४ वर्षे ३ महिने) असे मृत्यू झालेल्या दोन्ही भावांची नावे आहेत. मनोज वाघरी हे पत्नी आणि पाच मुलांसह वडाळा सुभाष नगर येथे राहण्यास आहे. (Missing Sibling) मनोज वाघरी यांची दोन मुले अंकुश आणि अर्जुन हे दोघे रविवारी सकाळी घराजवळ असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या (Municipal Corporations) ‘वन गार्डन’ (BMC Forest Garden) च्या भिंती लागत खेळत होते. बराच वेळ झाला मुले घरी परतली नसल्यामुळे मनोज वाघरी यांची पत्नीने मुलाचा शोध घेतला परंतु दोघेही मिळून आले नाही. पत्नीने मुले मिळून येत नसल्यामुळे पती मनोजला कळवले, पती पत्नी दोघांनी संपूर्ण परिसर शोधला परंतु मुले मिळून आली नाही. (Mumbai Crime)
अखेर माटुंगा पोलीस ठाण्यात मुले बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली, माटुंगा पोलिसांनी मुले अल्पवयीन असल्यामुळे अपहरणाचा गुन्हा दाखल करून मुलाचा शोध सुरू केला. रविवारी दिवसरात्र शोध घेऊन ही मुले मिळून येत नसल्यामुळे कुटुंब चिंतेत होते, सोमवारी सकाळी पुन्हा मुलांचा शोध घेत असताना वन गार्डन येथील उघड्या पाण्याच्या टाकीत दोन मुलाचे मृतदेह रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी दोन्ही मृतदेहाची ओळख पटवली असता दोन्ही मृतदेह अंकुश आणि अर्जुन या दोन भावंडांची असल्याची ओळख पटली. रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी प्राथमिक तपासावरून अपमृत्यूची नोंद करून दोन्ही मृतदेह केईएम रुग्णालय (KEM Hospital) येथे पूर्व तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. (Mumbai Crime)
पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वन गार्डन हे मनपाचे गार्डन असून ते गार्डन रफी किडवाई मार्ग पोलिसांच्या हद्दीत आहे, गार्डनमध्ये खूप जुनी जमिनीत पाण्याची मोठी टाकी असून त्या टाकीचा झाकणे उघडी होती, त्याच्यावर काळ्या रंगाचे प्लास्टिक टाकण्यात आले होते, मुले खेळता खेळता या पाण्याच्या टाकीत पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. (Mumbai Crime)
पाण्याच्या टाकीवर झाकणे नसल्यामुळे ही दुर्घटना घडली असून याला सर्वस्वी मुंबई महानगरपालिकेचे संबंधित अधिकारी जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. (Mumbai Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.