Eknath Khadse यांचा भाजपात प्रवेश? सून रक्षा खडसेंचा मोठा दावा

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंनी पुन्हा भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ खडसेंनी भाजपात पुनरागमन करावे, यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे मला कळले आहे. दिल्ली आणि राज्यातून ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आहे

241
Eknath Khadse यांचा भाजपात प्रवेश? सून रक्षा खडसेंचा मोठा दावा

महाराष्ट्राचे माजी भाजप नेते एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) राजकारणातील पुनरागमनाबाबत बरीच चर्चा आहे. अटकळींना उधाण आणत, एकनाथ खडसेंच्या सून रक्षा खडसेंनी एक महत्त्वपूर्ण विधान केले त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांत अनेक दिग्गजांनी भाजपात प्रवेश केला आहे. एकनाथ खडसेंनी भाजपात यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे.

(हेही वाचा – Byju : बायजूचे सीईओ रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस)

रक्षा खडसेंचा मोठा दावा –

गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठे नेते भाजपामध्ये दाखल होत आहेत. एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) भाजपमध्ये यावं ही आपली व सर्वांची इच्छा आहे. एकनाथ खडसे यांचा भाजपचा पक्षप्रवेश हा जरी वरिष्ठ पातळीचा निर्णय असला त्यावर एकनाथ खडसे यांच्या मनात काय हे सगळं घडल्यानंतरच आपल्यासमोर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रक्षा खडसे यांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

(हेही वाचा – Ghazwa-e-Hind : काफिर हिंदूंशी युद्धाचे समर्थन, भारताचे इस्लामीकरण; देवबंदवर काय होणार कारवाई ?)

भाजप नेत्याची मागणी –

गिरीश महाजन म्हणाले की, एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) पुन्हा भाजपात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आहे. एकनाथ खडसेंनी भाजपात पुनरागमन करावे, यासाठी ते प्रयत्न करत असल्याचे मला कळले आहे. दिल्ली आणि राज्यातून ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आहे. एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपात आणायचे आहे का, असे मला कोणीही विचारले नाही. मी छोटा कार्यकर्ता आहे. कदाचित एकनाथ खडसे यांची थेट वरुन हॉटलाईन असेल तर त्यांनी लावावी, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे.

(हेही वाचा – Bhagat Singh Koshyari राज्यपाल असताना घेतलेल्या देणग्यांची माहिती राजभवनाकडे नाही)

भाजपने माझा खूप छळ केला – एकनाथ खडसे

अलीकडेच एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) आपण भाजपात प्रवेश करणार की नाही या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली होती. ‘भाजपने माझा खूप छळ केला आहे, त्यामुळे मी पुन्हा भाजपात जाण्याचा विचारही करणार नाही. असे खडसेंनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.