ED raid on Sheikh Shahjahan : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरी छापेमारी

127
ED raid on Sheikh Shahjahan : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरी छापेमारी
ED raid on Sheikh Shahjahan : तृणमूल काँग्रेसचे नेते शेख शाहजहान यांच्या घरी छापेमारी

केंद्रीय अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) अधिकाऱ्यांचे एक पथक सकाळी उत्तर 24 परगना जिल्ह्यातील संदेशखली येथील तृणमूल काँग्रेस (TMC) नेते शेख शाहजहान यांच्या निवासस्थानी पोहोचले. बुधवार, 24 जानेवारी सकाळी ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा छापे टाकण्यासाठी केंद्रीय निमलष्करी दलाच्या (CPF) मोठ्या संख्येने सशस्त्र कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेत प्रवेश केला आहे. (ED raid on Sheikh Shahjahan)

या महिन्याच्या 5 तारखेला अशाच प्रकारच्या छाप्यात शाहजहानच्या हजारो समर्थकांनी ईडीच्या अधिकाऱ्यांवर हल्ला केला होता, ज्यामध्ये तीन लोक जखमी झाले होते आणि वाहनांचेही नुकसान झाले होते. 20 दिवसांनंतर ईडीची टीम पुन्हा एकदा छाप्यासाठी आली. जिल्हा पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.

(हेही वाचा – Rohit Pawar ED Raid : ईडी ही भाजपची शाखा; रोहित पवार यांच्या चौकशीच्या प्रकरणी संजय राऊत यांचे आरोप)

संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण करणार

ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय दलाच्या 125 हून अधिक जवानांसह सात जणांचे पथक बुधवार, 24 जानेवारी रोजी सकाळी 25 वाहनांमध्ये शाहजहानच्या घरी पोहोचले. या वेळी ईडीने आपला व्हिडिओग्राफर आणला आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे चित्रिकरण केले जाईल. ईडीने यापूर्वी जिल्हा पोलिसांना माहिती दिली होती.

घराला होते कुलूप

या वेळीही ईडीच्या अधिकाऱ्यांना शाहजहानच्या घरात प्रवेश करण्यात काही अडचणी आल्या; कारण घराला कुलूप होते. जेव्हा त्याला चावी विचारण्यात आली, तेव्हा त्याने सांगितले की त्याच्याकडे चावी नाही. यानंतर ईडीने दोन साक्षीदारांच्या उपस्थितीत कुलूप उघडले असून तपास सुरू करण्यात आला आहे. हा अहवाल प्रकाशित होईपर्यंत या प्रकरणात कोणतीही नोंद झाली नव्हती. (ED raid on Sheikh Shahjahan)

कोण आहेत शेख शाहजहान

शेख शाहजहान हे उत्तर 24 परगणा जिल्हा परिषदेचे मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन अधिकारी आणि संदेशखळीचे TMC ब्लॉक अध्यक्ष आहेत. ते ममता सरकारमधील वनमंत्री ज्योतिप्रिया मलिक यांच्या जवळचे आहेत. ईडीने 27 ऑक्टोबर 2023 रोजी रेशन घोटाळ्याप्रकरणी ज्योतिप्रिया मलिक यांना अटक केली होती.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.