अनिल परब यांना ईडीचा दणका, दुसरे समन्स बजावले

103

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतमोजणीची प्रक्रिया सुरु असतानाच परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचा दुसरा समन्स पाठवण्यात आला आहे. त्यामुळे परब यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीला हजर रहावे लागणार आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शिवसेनेला धक्का बसला आहे.

ईडीने ७ ठिकाणी छापे मारले होते

मंत्री परब यांना ईडीचे पहिले समन्स १४ जून रोजी बजावले होते. त्यांना दापोली येथील रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. बुधवारी, १५ जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये ७ ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते. यात मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. यावेळी ईडीने या रिसॉर्टच्या जागेवरील मूळ जागामालक विभास साठे यांचा जबाबही ईडीने नोंदवून घेतला होता. दुसरीकडे अनिल परब यांचे साई रिसॉर्ट सीआरझेडचे उल्लंघन करून बांधण्यात आल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यामुळे परब हे अडचणीत सापडले आहेत.

(हेही वाचा मतदान संपले आता निकालाची प्रतीक्षा! चमत्कार घडणार की आकडे जिंकणार?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.