उद्धव गट आणि शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी कुणाला किती दिली पार्किंग?

107

मुंबईत उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट या दोन्ही गटांचा वेगवेगळा दसरा मेळावा होणार आहे. या दोन्ही मेळाव्यांसाठी येणाऱ्या दोन्ही गटांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था मुंबई वाहतूक पोलिसांकडून करण्यात आली आहे. दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या शिंदे गटातील पदाधिकारी यांच्यात पार्किंग प्रमुख नेमण्यात आले आहेत. वाहनावरील नियंत्रण तसेच पार्किंग व्यवस्था करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून एक पार्किंग प्रमुख शिंदे गटांकडून निवडण्यात आलेला आहे. हे पार्किंग प्रमुखांना प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे कुठल्या मार्गाने मेळाव्यासाठी यायचे, त्यांची वाहने कुठे पार्क करायची, याबाबत माहिती देण्यात आलेली असून त्यांनी त्यांना ठरवून दिलेल्या ठिकाणीच आपले वाहन पार्क करावी, जेणेकरून गोंधळ होणार नाही अशी सुचना वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली आहे.

शिंदे गटासाठी पार्किंग व्यवस्था 

पश्चिम द्रुतगती महामार्ग, धारावी वरळी सी लिंककडून मेळाव्यासाठी येणाऱ्यासाठी वाहन पार्किंग

बसेससाठी पार्किग व्यवस्था: 

  • फॅमिली कोर्टमागील बाजू व्हाया जेतवन बिल्डींग ते इन्कम टॅक्स जंक्शन पर्यंतची मोकळी जागा
  • कॅनरा बँकेजवळील एमएमआरडीए पे ॲन्ड पार्क कॅनरा बँक, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स वांद्रे पूर्व
  • पंजाब नॅशनल बँकेसमोरील मोकळे मैदान वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स
  • फटाका मैदान कॅनरा बँकेसमोरील मैदान (कनेक्टर सी/३२, जी ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स)
    एमएमआरडीए कार्यालयासमोर, मागील मोकळी जागा, फॅमिली कोर्ट, वांद्रे- कुर्ला कॉम्पलेक्स
  • जिओ गार्डनजवळ एमएमआरडीए पे अॅन्ड पार्क आय एलएफएस बिल्डींगसमोर, भारत नगर वांद्रे पूर्व

कारसाठी पार्किंग व्यवस्था

  • जिओ गार्डन बेसमेंट पार्किंग वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स
  • नवी मुंबईकडून बिकेसी कनेक्टर ब्रिजमार्गे बिकेसी येथील वाहनांसाठी पार्किंग

(हेही वाचा कोणाच्या दसरा मेळाव्याला होणार सर्वाधिक गर्दी? पोलिसांचा सर्व्हे काय सांगतो?)

बसेससाठी पार्किंग व्यवस्था

  • वुई वर्क इमारत शेजारील मोकळे मैदान, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स, वांद्रे पूर्व.
  • ओएनजीसी बिल्डींगचे उजवे व डावीकडील गोकडे मैदान कॅनरा बँकेसमोरील मोकळे मैदान सी/६९. जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स
  • कॅनरा बँकेसमोर वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स
  • सोमैय्या कॉलेज मैदान चुनाभट्टी

कारसाठी पार्किंग व्यवस्था:

  • एम सी ए. बलब कार पार्किंग, एम.सी.ए. वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्स
  • पश्चिम दृतगती मार्गाने कलिनामधून येणारी वाहने तसेच पूर्व दृतगती मागाने एससीएलआर मार्गे मेळाव्यामध्ये सहभागी

लोकांना घेवून येणारे वाहने पार्किंगकरीता बसेससाठी पार्किग व्यवस्था:

  • सीबीआय बिल्डींग शेजारील मोकळे मैदान, प्लॉट नं. सी / ३५ ए, जी ब्लॉक, वांद्रे- कुर्ला कॉम्प्लेक्स
  • टाटा कम्युनिकेशन ते इन्कमटॅक्स क्वॉटर्स रोडपर्यंत पार्किंग वांद्रे पूर्व
  • हॉटेल ट्रायडेंन्ट गॅप ते बीकेसी रोडपर्यंत पार्किंग वांद्रे कुर्ला काम्पलेक्स
  • अंबानी संकुल शेजारील पे अॅन्ड पार्क पार्किंग
  • एमएमआरडीए पे अॅन्ड पार्क
  • एम.टी.एन.एल ते कनेक्टर जंक्शन एकेरी पार्किंग
  • युनिव्हर्सिटी गेटमधील मोकळा परिसर मुंबई विद्यापीठ, कालिगा, सांताक्रुझ पूर्व
  • जे. कुमार, ट्रेड सेंन्टर समोरील मोकळी जागा

(हेही वाचा दिवसाढवळ्या बिबट्या करतोय हल्ला, कोकणातील पाभरे गावकरी झाले भयभीत)

कार पार्किंग :

  • डायमंड बोर्स बेसमेंट पार्किंग
  • जिओ सेंटर पार्किग
  • कार्यक्रमस्थळी महत्वाचे आणि अती महत्वाचे यांचे वाहने पार्किग व्यवस्था:
  • जे.एस. डब्लू समोरील मोकळे मैदान
  • जे.एस. डब्लू इमारत,वांद्रे कुर्ला काम्पलेक्स

ठाकरे गटासाठी पार्किंग व्यवस्था :

पश्चिम आणि उत्तर उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने खालील ठिकाणी पार्क करतील

बसेससाठी पार्किंग

  • सेनापती बापट मार्ग दादर पश्चिम
  • कामगार मैदान एल्फिन्स्टन रोड
  • इंडिया बुल फायनान्स
  • इंडिया बुल- १ सेटर
  • कोहिनुर स्केअर

ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व द्रुतगती मार्गाने येणारे वाहन –

बसेससाठी पार्किंग

  • पाच गार्डन माटुंगा
  • नाथालाल पारेख मार्ग माटुंगा
  • एडनवाला रोड माटुंगा
  • आर.ए.के. रोड, वडाळा

वीर सावरकर रोड मार्गे दक्षिण मुंबईकडून मेळाव्यासाठी लोकांना घेवून येणारे वाहन चालक त्यांची वाहने रविंद्र नाटय मंदिर येथे लोकांना उतरवून खालील ठिकाणी पार्क करतील.

बस पार्किंग :

आप्पासाहेब मराठे मार्ग, प्रभादेवी, मुंबई

कार पार्किंग:

  • इंडियाबुल इंटरनॅशनल सेंटरसेनापती बापट मार्ग, एलफिन्सटन (प)
  • इंडिया बुल १ सेंटर ज्युपिटर मिल कंम्पा. सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन (प)
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.