मुर्मूंना इतर पक्षांतील नेत्यांची मतेही मिळतील, फडणवीसांना विश्वास

55

सोमवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठीचा निवडणूक कार्यक्रम पार पडला आहे. यामध्ये भाजपप्रणित एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि यूपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात असताना आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधान केले आहे. द्रौपदी मुर्मू यांना भाजपसह इतर पक्षांतील नेत्यांचीही मते मिळतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

इतर पक्षातील नेत्यांची मतं मिळतील

राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कोणत्याही पक्षाचा व्हिप नसतो. यामध्ये सद्सद् विवेक बुद्धीनेच मतदान करायचे असते. त्यामुळे इतर पक्षांतील आमच्या ज्या मित्रांची सद्सद् विवेक बुद्धी जागृत आहे असे नेते आम्हाला मतदान करतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

(हेही वाचाः शिवसेनेतून गळती सुरूच, पुणे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे शिंदे गटात)

राष्ट्रपती पदाची निवडणूक

सोमवारी सकाळपासून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही गृहांतील निवडून आलेले सदस्य तसेच सर्व राज्यांच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील निवडून आलेले सदस्य राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.