गेल्या काही दिवसांपासून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये एकमेकांचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची पळवापळवी करण्यावरून वादंग माजला होता. मात्र या वादावर पडदा पडल्यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) हे दोघेही नेते सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर एकत्र येऊ लागले आहेत. पश्चिम डोंबिवलीतील एका कार्यक्रमात शिवसेनेचे खासदार आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष एकाच व्यासपीठावर आले त्यांच्यात मनोमिलन झाल्याचे दिसून आले. (Dombivli News)
डोंबिवली पश्चिम येथे नव्याने २.५ लक्ष मि.ली. क्षमतेच्या जलकुंभची उभारणी करण्यात येत आहे. या जलकुंभचे भूमिपूजन रविवारी पार पडले. या जलकुंभाच्या उभारणीनंतर गणेश घाटासह डोंबिवली पश्चिमेतील सर्व नागरिकांची मुबलक पाण्याची सोय होणार आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भविष्यकाळातही आपल्या डोंबिवली शहराच्या विकासासाठी शिवसेना आणि आपले महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्यासह खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त केले. (Dombivli News)
(हेही वाचा – DCM Eknath Shinde यांनी विधान परिषदेत बोलताना कुणाची केली रहमान डकैतशी तुलना?)
यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नंदू परब, युवासेनेचे कल्याण लोकसभा जिल्हाध्यक्ष जीतेन पाटील, विश्वनाथ राणे, विनिता राणे, रमेश म्हात्रे, संजय पावशे, रणजित जोशी, वृषाली जोशी, मुकेश पाटील, संगीता पाटील, दिपेश म्हात्रे, तसेच अपर्णा पावशे, प्रवीण म्हात्रे, सागर जेधे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Dombivli News)
यापूर्वी कल्याण-डोंबिवलीत दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता, ज्यामुळे महायुतीच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र दोन्ही नेत्यांच्या दिल्ली दौऱ्यांनंतर आणि केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या स्पष्ट संदेशानंतर भाजपा-शिवसेनेचा एकत्र लढण्याचा सूर वाजू लागला होता. रविवारच्या भूमिपूजन समारंभात दोन्ही नेत्यांनी एकाचवेळी विकासकामांचे श्रेय घेत आगामी निवडणुकांसाठी युतीचे शक्तीप्रदर्शन केल्याचे स्पष्ट झाले. सध्या कल्याण-डोंबिवलीचे राजकीय चित्र पाहता रविंद्र चव्हाण आणि डॉ. श्रीकांत शिंदे यांचे एकत्र येणे अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. या दोन नेत्यांच्या भेटीमुळे स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांमधील गैरसमज दूर होतील आणि आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणुकीत युती म्हणून लढण्याची तयारी होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या एकत्र येण्याने कल्याण-डोंबिवलीमध्ये पुन्हा एकदा महायुतीच्या चर्चेला मोठा जोर आला आहे. (Dombivli News)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

