-
प्रतिनिधी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून भाजपा आमदार चित्रा वाघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यात चांगलीच जुंपली झाली आहे. सोशल मीडियावरून दोघींमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. (Disha Salian Case)
दिशा सालियन प्रकरणावरून गुरुवारी विधानपरिषदेत भाजपा आमदार चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी शिवसेना (उबाठा) आमदार अनिल परब यांच्यासोबत त्यांची जोरदार खडाजंगी झाली. वाघ यांच्या या आक्रमक भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. (Disha Salian Case)
(हेही वाचा – कर्नाटकात मुस्लिम आरक्षण मंजूर; Congress च्या तुष्टिकरणामुळे मुस्लिम ठेकेदारांना मिळणार निविदा प्रक्रियेत ४ टक्के आरक्षण)
यावर राष्ट्रवादीच्या रोहिणी खडसे यांनी खोचक प्रतिक्रिया देत चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्वीट करत वाघ यांचा व्हिडीओ शेअर केला आणि म्हणाल्या, “बाईईईईई काय हा प्रकार… थोडं थोडं साम्यच आहे, नाही! पण कोणीतरी सांगा की आपल्या राज्याचे ते सर्वोच्च सभागृह आहे… बिग बॉसचा एखादा सीझन नाही. चित्रा वाघ यांचे भाषण पाहून मला बिग बॉसचा सीझन आठवला. कार्यक्रमात जितकी एकमेकांची उनी-धुणी काढाल, तेवढाच बिग बॉस खूश होतो. तसंच चित्रा वाघ यांनी हे वक्तव्य कोणाला तरी खूश करण्यासाठी केले का?” असा सवालही खडसे यांनी उपस्थित केला. (Disha Salian Case)
रोहिणी खडसे यांच्या या टीकेला चित्रा वाघ यांनीही तितक्याच ठाम शब्दांत प्रत्युत्तर दिलं. “रोहिणी खडसे यांचे वडील विधान परिषदेत माझ्या समोर बसतात, त्यांनी त्यांना विचारावे, ते जास्त चांगलं सांगतील,” असं म्हणत वाघ यांनी खडसेंवर पलटवार केला. या जुपंलीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलाच रंगतदार वाद रंगला असून, सोशल मीडियावरही या दोघींच्या या वादाची जोरदार चर्चा सुरू आहे. दिशा सालियन प्रकरणाच्या निमित्ताने सुरु झालेला हा वाद आणखी किती वाढतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. (Disha Salian Case)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community