MLA Disqualification Petition : दिल्लीत अनेक तज्ञांबरोबर चर्चा – राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

111
MLA Disqualification Petition : दिल्लीत अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा - राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण
MLA Disqualification Petition : दिल्लीत अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा - राहुल नार्वेकर यांचे स्पष्टीकरण

दिल्ली येथील काही भेटीगाठी कायदेतज्ञांबरोबर होत्या. एकूण अपात्रतेबाबतचा हा कायदा बदलत जाणारा आहे. (MLA Disqualification Petition) त्यात बदल होत राहतात. परिस्थितीनुसार या कायद्यात बदल होत असतात. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जी याचिका दाखल झाली आहे, त्याबाबत आलेले आदेश किंवा या कायद्यात आणखी काय दुरुस्ती करण्याची गरज आहे किंवा या कायद्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणे आवश्यक आहे, या संदर्भातील अनेक विषयांवर माझी अनेक तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली, असे स्पष्टीकरण अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहे. आमदार अपात्रतेच्या याचिकांच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर २१ सप्टेंबर रोजी दुपारी नवी दिल्लीला गेले हाेते. राहुल नार्वेकर दिल्लीत कुणाला भेटले आणि या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याविषयी तर्क-वितर्क लावले जात होते. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते २२ सप्टेंबर रोजी दिल्लीत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

(हेही वाचा – Crime News : मानसिक तणावात असलेल्या मातेने दीड महिन्याच्या मुलीला १४व्या मजल्यावरून फेकले)

राहुल नार्वेकर पुढे म्हणाले, ”सर्वोच्च न्यायालयाने एका आठवड्यात पुढील सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते. तशीही आमची सुनावणी १४ सप्टेंबरला झालेली आहे. आमची पूर्वनियोजित सुनावणी होतीच. त्यामुळे येत्या आठवड्यात आम्ही निश्चितपणे सुनावणी घेऊन निर्णय घेऊ. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही सुनावणीला बोलावण्याची  गरज पडली, तर पक्षाच्या प्रमुखांना बोलावण्यात येईल. (MLA Disqualification Petition)

सर्वोच्च न्यायालयाने ११ मे रोजी शिवसेनेच्या सत्तासंघर्षावरील निकाल दिला होता. १६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी वाजवी वेळेत घ्यावा, असे न्यायालयाने निकालात म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केली नाही. यावरून सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना सुनावले आहे. पुढील एका आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीला सुरुवात करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानंतर हालचालींना वेग आला आहे. (MLA Disqualification Petition)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.