बारसू रिफायनरीबाबत उदय सामंत आणि शरद पवारांमध्ये काय झाली चर्चा?

बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी दोन दिवसांपासून सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. मात्र काही स्थानिकांना या सर्व्हेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यामध्ये स्थानिक महिला देखील आहेत. (Barsu Refinery)

177
discussion was held between Uday Samant and Sharad Pawar regarding the Barsu Refinery
बारसू रिफायनरीबाबत उदय सामंत आणि शरद पवारांमध्ये काय झाली चर्चा?

कोकणातील राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनगरी (Barsu Refinery) प्रकल्पाला स्थानिक तीव्र विरोध करत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिकांचे आंदोलन सुरू असून संपूर्ण परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. अशातच दुसऱ्याबाजूला या प्रकल्पाबाबत राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. याच पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भेट घेतली. या भेटीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन उदय सामंत यांच्यासोबत झालेल्या चर्चेत काय झाले याबाबत स्पष्ट केले.

गुरुवारी उदय सामंत अधिकाऱ्यांसमवेत आंदोलकांसोबत बैठक घेणार

पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, ‘उदय सामंतांनी बारसू येथील प्रकल्पाबाबतचा (Barsu Refinery) आढावा दिला. या प्रकल्पासाठी कोणाचीही जमिनी घेतलेली नाही. या ठिकाणी माती परीक्षण सुरू असल्याची माहिती उदय सामंतांनी दिली. दरम्यान स्थानिक आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन यावर तोडगा काढण्याची सूचना सामंत यांना केली होती, ती सूचना सामंत यांनी मान्य केली आहे. गुरुवारी उदय सामंत अधिकाऱ्यांसह आंदोलकांसोबत बैठक घेणार आहेत. मी सामंत यांना प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांची काही प्रश्न असतील ते सोडवले पाहिजे, असे सूचवले आहे. त्यामुळे आता गुरुवारच्या बैठकीत काय तोडगा निघतो, हे पाहावे लागेल.’

(हेही वाचा – Uday Samant : बारसू प्रकरणावरून मंत्री उदय सामंत यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका)

‘आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नको’  (Barsu Refinery)

दरम्यान बारसू रिफायनरी (Barsu Refinery) प्रकल्पासाठी दोन दिवसांपासून सर्व्हेक्षण सुरू झाले आहे. मात्र काही स्थानिकांना या सर्व्हेक्षणाला तीव्र विरोध दर्शवला आहे. यामध्ये स्थानिक महिला देखील आहेत. आम्हाला आमची जागा प्रकल्पासाठी द्यायची नाही, आम्ही लोकशाही मार्गाने शांततेने येथे आंदोलन करत होतो. तरीही आमच्या लोकांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून नेण्यात आले. तसेच महिलांनाही नेण्यात आले. आम्हाला हा प्रदूषणकारी प्रकल्प नको, अशी भूमिका स्थानिकांनी मांडली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.