Dinesh Sharma : ही निवडणूक सावरकरांना आदर्श मानणारे आणि त्यांचा अपमान करणारे यांच्यातील आहे; दिनेश शर्मा यांचे परखड प्रतिपादन

Dinesh Sharma : बाळासाहेब ठाकरे हे वीर सावरकरांना आपले आदर्श मानत असत. वीर सावरकरांना आदर्श मानणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाशी युती केली आहे, असे दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे.

93
Dinesh Sharma : ही निवडणूक सावरकरांना आदर्श मानणारे आणि त्यांचा अपमान करणारे यांच्यातील आहे; दिनेश शर्मा यांचे परखड प्रतिपादन
Dinesh Sharma : ही निवडणूक सावरकरांना आदर्श मानणारे आणि त्यांचा अपमान करणारे यांच्यातील आहे; दिनेश शर्मा यांचे परखड प्रतिपादन

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रभारी आणि उत्तर प्रदेशचे माजी उपमुख्यमंत्री डॉ. दिनेश शर्मा (Dinesh Sharma) यांनी मुंबईतील दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला भेट दिली. त्यांच्यासोबत भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) उपस्थित होते. या वेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : निवडणुकीसाठी प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा भाजपाचा निर्धार)

दिनेश शर्मा यांनी स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याला आदरांजली वाहिली. या वेळी स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी लिहिलेले ‘मेक शुअर गांधी इज डेड’ हे पुस्तक दिनेश शर्मा यांना भेट दिले. महाराष्ट्रातील आगामी लोकसभा निवडणुकीबाबतही (Lok Sabha Elections 2024) दिनेश शर्मा यांनी भाष्य केले.

सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनता चोख प्रत्युत्तर देईल – दिनेश शर्मा

‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिनेश शर्मा म्हणाले, ‘बाळासाहेब ठाकरे हे वीर सावरकरांना आपले आदर्श मानत असत. वीर सावरकरांना आदर्श मानणारी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांनी वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाशी युती केली आहे. यामुळे सर्वांनाच त्रास झाला आहे. निवडणुकीतही हा एक मुद्दा आहे. ही निवडणूक वीर सावरकरांना आदर्श मानणारे आणि त्यांचा अपमान करणारे यांच्यातील आहे. वीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना जनता चोख प्रत्युत्तर देईल, असे मला वाटते.’

(हेही वाचा – Gopinath Munde : शरद पवार तुमच्यावर ही अशीच वेळ येणार; गोपीनाथ मुंडे यांचा ‘तो’ व्हिडिओ होतोय व्हायरल)

शर्मा म्हणाले की, राज्यातील भारतीय जनता पक्ष (भाजप), शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी) यांची महायुती लोकसभेच्या सर्व 48 जागा जिंकण्याचा संकल्प घेऊन मैदानात उतरली आहे. भाजपाचे कार्यकर्ते सर्व जागा जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठा विजय मिळवून देतील. (Dinesh Sharma)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.