आनंद दीघेंनी राज ठाकरेंना हिंदुजननायक समजले होते का? धर्मवीर सिनेमातील काय सांगतो ‘तो’ प्रसंग?

201

बहुप्रतिक्षेत सिनेमा धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे हा आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट 13 मे पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर, या चित्रपटाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या चित्रपटात आनंद दिघेंची भूमिका अभिनेता प्रसाद ओक याने साकारली आहे. दरम्यान, या चित्रपटातील आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आनंद दिघेंच्या भेटीला राज ठाकरे

राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा रुग्णालयातील भेटीचाही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मनसे रिपोर्ट या अकाऊंटवरुन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. आनंद दिघे हे रुग्णालयात असून, राज ठाकरे त्यांच्या भेटीसाठी गेल्याचे या फोटोतून दिसत आहे. हिंदुत्वाची जबाबदारी आता तुमची, असे या फोटोला कॅप्शन देत, हा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. त्यामुळे आनंद दिघे हे राज ठाकरे यांना हिंदुजननायक समजत होते का? अशी चर्चा आता सर्वत्र रंगू लागली आहे.

( हेही वाचा: सरकारी नोकरीची मोठी संधी! २०६५ रिक्त पदांसाठी भरती )

व्हिडीओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल

मनसे रिपोर्ट या अकाऊंटवरुन फोटो शेअर करत, आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यातील शेवटचा संवाद असे म्हणत, हिंदुत्वाची जबाबदारी आता तुझी असे म्हटले आहे. तसेच, सोबत सिनेमातील राज आणि आनंद दिघे यांच्या भेटीचा व्हिडीओही शेअर करण्यात आला आहे. ही व्हिडीओ क्लीप सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.