महाराष्ट्र भाजप संपवण्याची काय होती टूलकीट? देवेंद्र फडणवीसांचा पुराव्यांसह गौप्यस्फोट

129

सरकारी वकील प्रविण चव्हाण हे ठाकरे सरकारमधील प्रमुख मंत्र्यांच्या सांगण्यावरून महाराष्ट्र भाजपातील प्रमुख नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवाचये आणि त्यांना अटक करायचे, त्यामध्ये देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुंगटीवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, चंद्रकांत बावनकुळे यांना टार्गेट करायचे, अशा प्रकारचे टूलकीट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी विधानसभेत उघड केले.

सीबीआय चौकशी करावी

2021मध्ये गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केला. 2018मध्ये मराठा शिक्षण मंडळाच्या एका गटात संघर्ष आहे. पाटील गट आणि भोईटे गटात हा संघर्ष आहे. महाजनांचे स्वीय सहाय्यकाने अपहरण केल्याची बनावट केस केली. त्या केसमध्ये महाजनांना मोक्का लागला पाहिजे, असे सांगून मोका लावण्याचे कागदपत्रे तयार झाली. यासाठी सरकारी वकील चव्हाण हे ज्यांच्या ज्यांच्या सोबत बोलणे करत होते, त्या वेळीचे व्हिडिओ रेकॉर्डींगसह पुरावे फडणवीस यांनी सभागृहात मांडले, ते सर्व पुरावे विधानसभा अध्यक्षांनाही दिले. तसेच या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून करण्यात यावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली. जर या मागणीची पूर्तता झाली नाही, तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा इशाराही दिला.

(हेही वाचा ईडीचे ४ अधिकारी गजाआड जाणार! संजय राऊतांनी काय केला गौप्यस्फोट?)

गिरीश महाजनांना मोक्काखाली अडकवण्याचा कट

भाजपाचे नेते गिरीश महाजन यांना मोक्का कायद्याखाली अडकवण्याचा कट रचण्यात आला होता. त्यासाठी त्यांना ड्रग्जच्या आरोपाखाली अडकवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी रक्त लागलेला चाकू त्यांच्याकडे ठेवण्याचेही ठरवण्यात येत होते, यासाठी खोटे पंचनामे, खोटे पुरावे, खोटे पंच, खोटा एफआयआर हे सर्व करण्याचे कारस्थान त्या सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी रचले होते, असे फडणवीस म्हणाले.

कोणत्या मंत्र्यांवर केले आरोप?

या कारस्थानात देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांना संपवण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी अजित पवार, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, एकनाथ खडसे या सर्वांचा यात समावेश होता, असाही आरोप फडणवीस यांनी केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.