Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय, देवेंद्र फडणवीसांनी लगावला खोचक टोला

179
Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी केलेले एक चांगले काम दाखवावे; फडणवीसांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या आहेत. याबाबत उद्धव ठाकरेंनी केलेला हल्लाबोल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परतवून लावला आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंच्या ‘महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय’, या व्यक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलं आहे.

ते म्हणाले की, ‘उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला, Get Well Soon’, असा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. ‘उद्धव ठाकरेंची भाषा आणि त्यांचे जे शब्द आहे. ते पाहिल्यावर माझं ठाम मत झालेलं आहे की, उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मी Get Well Soon एवढंच म्हणेन’, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

(हेही वाचा – Doctor Dismissed : सरकारी रुग्णालयात ऑपरेशन थिएटरमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करणाऱ्या डॉक्टरवर कारवाई)

राज्यात घडलेल्या घटना गंभीर आहेत. त्या व्यक्तिगत वैमनस्यातून घडलेल्या घटना आहेत. त्यामुळे त्याचा कायदा, सुव्यवस्था आणि राज्याची परिस्थिती याच्याशी थेट संबंध जोडणं अयोग्य आहे. त्याबाबत कडक कारवाई करत आहे, असंदेखील फडणवीसांनी म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.