‘किक कशी मारायची हे शेलारांना बरोबर माहीत आहे’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला

90

मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे. गेली 25 वर्ष मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेसाठी यंदाची निवडणूक ही एकप्रकारे अस्तित्वाची लढाई मानली जात आहे. तर भाजपनेही मुंबईत सत्तांतर करण्यासाठी कंबर कसली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा जंगी सामना रंगणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

(हेही वाचाः ‘65 मे से 50 निकल गए, अब बस दो ही बचे है’, फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला)

मुंबई भाजपने नुकतीच मुंबई भाजप अध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा आशिष शेलार यांच्याकडे सोपवली आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुका या आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजप लढवणार आहे. तेव्हा आशिष शेलार यांना शुभेच्छा देताना फडणवीस भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

किक कशी मारायची हे शेलारांना माहीत आहे

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आशिष शेलार यांनी मुंबईत मुंबई क्रिकेट लीग सुरू केली. पण आता मुंबई महापालिकेत मुंबई विकास लीग आपल्याला सुरू करायची आहे. त्यासाठी आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. पण आशिष शेलार यांनी फुटबॉलची देखील अनेक मैदाने तयार केली आहेत. त्यामुळे मध्ये एखादा अडथळा आला तर त्याला किक कशी मारायची हे त्यांना नीट माहित असल्याचे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांच्याबाबत विश्वास व्यक्त केला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.