Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर

महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यातील ओबीसी नेता, हा मंत्री पदापेक्षा वरचढ ठरत असल्याने, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजासाठी काम करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

281
Chhagan Bhujbal यांच्या राजीनाम्याच्या मागणीला जोर

महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्यातील ओबीसी नेता, हा मंत्री पदापेक्षा वरचढ ठरत असल्याने, त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पूर्णवेळ समाजासाठी काम करावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (Chhagan Bhujbal)

आरक्षणास धक्का असल्याची भीती

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) केलेल्या आंदोलनाच्या अंतिम टप्प्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी त्यांची भेट घेऊन ‘सगेसोयरे’ यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत एक दुरुस्ती सुचविणारी अधिसूचना जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या हाती दिली. ही अधिसूचना ओबीसी आरक्षणास (OBC Reservation) धक्का असल्याची भीती काही ओबीसी नेत्यांनी व्यक्त करत आहेत तर काहीनी ओबीसी नेत्यांनीही आरक्षणाला काही धोका नसल्याचे स्पष्ट केले. (Chhagan Bhujbal)

मंत्रीच सरकार विरुद्ध आंदोलन करणार

भुजबळ यांनी मंत्री पदावर राहून आपल्याच सरकारच्या निर्णयाविरुद्ध ‘आक्रोश मोर्चा’ आंदोलन करण्याची घोषणा केली तसेच राज्य शासनाच्या अधिसूचनेवर समाजाने मोठ्या प्रमाणावर हरकत घ्यावी, असे जाहीर आवाहन केले. यावर आक्षेप घेत शिवसेना (शिंदे) प्रवक्ते संजय शिरसाट यांनी त्यांना नाव न घेता त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देऊन आंदोलन करण्याचा सल्ला दिला. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – LIC Stake in HDFC : एलआयसीची वाढीव गुंतवणूक एचडीएफसी बँकेसाठी किती लाभदायक?)

राजकीय कपडे काढा, मग बोला

“सरकारची भूमिका स्पष्ट आहे. ज्यांची नोंद आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. यामुळे ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लागत नाही. मात्र जे आज या आरक्षणाला विरोध करत आहेत, त्यांची कोल्हेकुई चालू आहे, त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचे जोडे, कपडे काढावे आणि मग वक्तव्य करावे आणि आपली लीडरशिप कन्फर्म करावी,” असे शिरसाट म्हणाले. (Chhagan Bhujbal)

तुमची आणि सरकारची भूमिका एकच हवी

भुजबळ यांनी नोव्हेंबर मध्ये राजीनामा दिला होता मात्र तो मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केला नाही, अशी चर्चा होते. त्यावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले होते की मंत्रिमंडळातून मला कुणाला काढायचे असेल तर काढू शकतात. याबाबत विचारले असता शिरसाट म्हणाले, “कुणी कुणाला काढलं पाहिजे, ठेवलं पाहिजे यापेक्षा एक स्वाभिमान बाळगून, पद जुगारून थेट जनतेत जाऊन आपली बाजू मांडावी. पण जेव्हा आपण सरकारमध्ये आहोत, सरकारचे प्रतिनिधी आहोत तेव्हा तुमची आणि सरकारची भूमिका एकच असली पाहिजे. या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री, दोन्ही उप-मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी. त्यांनी ऐकलं तर ठीक, नाहीतर तुम्ही तमचे निर्णय घ्यायला सक्षम आहात,” असा टोला शिरसाट यांनी लगावला. (Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – Pune Crime : पोलीस स्थानकातच चोर-पोलिसाचा खेळ, पुण्यातील ४ पोलीस निलंबित, वाचा नेमकं काय घडलं…)

राजीनामा फेका ना सरकारच्या तोंडावर

माजी खासदार आणि ओबीसी (OBC) अभ्यासक हरिभाऊ राठोड यांनी भुजबळ यांना सुनावले. “मागासवर्गीय आयोगावर कुठलेही आक्षेप घेता येत नाही, तरी भुजबळ यांनी ते घेतले. आणि आता फेब्रुवारीमध्ये ते रथयात्रा काढणार आहेत. कशाला? त्यापेक्षा तुम्ही राजीनामा फेका ना सरकारच्या तोंडावर. सरकारमध्ये राहून ओबीसीचे नेतृत्व करत आहात. कशाला जनतेची फसवणूक करता?” असा सवाल केला. (Chhagan Bhujbal)

आरक्षणाला काहीही धोका नाही

राष्ट्रीय ओबीसी (OBC) महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनीही भुजबळांच्या विरोधात भूमिका घेतली. ते म्हणाले, “मी अधिसूचनेचा शब्दनशब्द वाचला, अभ्यास केला. यात काही नवीन नाही त्यामुळे ओबीसीचे (OBC) नुकसान झाले हे मला पटले नाही, आरक्षणाला काहीही धोका नाही.” (Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.