Deepak Kesarkar : नागरिकांची कामे प्रलंबित राहता कामा नये – दीपक केसरकर

पालकमंत्र्यांनी दिले प्रशासनाला सक्त निर्देश

113
Deepak Kesarkar: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय - दीपक केसरकर
Deepak Kesarkar: मनोज जरांगेंच्या आंदोलनामुळे मराठा समाजाची सहानुभूती कमी होतेय - दीपक केसरकर
मिळकत पत्रावर नाव, उत्पन्नाचा दाखला, निवृत्ती वेतन, रहिवासी दाखला, अशी महसूल विभागाशी संबंधित कागदपत्रे मुंबईतील नागरिकांना आता विहीत वेळेच्या आत मिळू लागली आहेत. ‘जनतेशी सुसंवाद’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पालकमंत्री (Deepak Kesarkar) म्हणून दखल घेत असल्याने व सर्व कागदपत्रेही वेळेवर मिळू लागल्याने नागरिकांच्या चेहेऱ्यावर हास्य फुलत आहे.त्यामुळे नागरिकांची कामे प्रलंबित राहता कामा नये, असे निर्देश आपण सर्व संबंधितांना दिल्याची माहिती मुंबई शहर पालक व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी बुधवारी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना दिली.
पालकमंत्री या नात्याने मुंबईच्या जनतेसाठी काम करण्याची, त्यांच्या समस्या प्रत्यक्षात जाणून घेण्याची संधी मिळत असल्याचे सांगून ते प्रश्न तातडीने सोडविण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर,अपर जिल्हाधिकारी रवी कटकधोंड, उपजिल्हाधिकारी कल्याण पांढरे, जयकृष्ण फड, जिल्हा नियोजन अधिकारी जी.बी.सुपेकर आदी उपस्थित होते, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.(Deepak Kesarkar)

(हेही वाचा-Acidity Cure : ॲसिडिटी त्रास होतो ? हे वाचा !

मिळकत पत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, कलावंतांना निवृत्ती वेतनासाठी संबंधित दाखले,जागेचा नकाशा,आधार कार्डच्या नोंदीत बदल, मतदार यादीत नाव नोंदणी, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र आदींसाठी अर्ज केलेल्या रहिवाश्यांनी आज भेट घेतल्याची माहिती देत त्यांनी मागील  आठवड्यात अर्ज केलेल्या १३ लाभार्थींना विविध प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. प्रमाणपत्रांसाठी फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही तसेच प्रमाणपत्रे तयार झाल्याचे लाभार्थींना दूरध्वनीवरून कळविण्यात येत असल्याने त्यांच्या चेहऱ्यावर स्मित फुलल्याचा दावाही केसरकर यांनी केला.

हेही पहा-https://www.youtube.com/watch?v=QXtN6p5B1HI

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.