देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले…

155
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले...
देवेंद्र फडणवीसांचा राज ठाकरेंवर पलटवार, म्हणाले...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर सध्या भाजप नेत्यांकडून टीका होत आहे. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर पलटवार केला आहे.

फडणवीस काय म्हणाले?

राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेवर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘आमच्या पराभवाचं विश्लेषण आम्ही करू, ते करण्याकरता आम्हाला दुसरं कोणीतरी नको. पण ठिक आहे, ते त्यांच मत असेल. भारतीय जनता पक्ष अनेक निवडणुका जिंकते, काही निवडणुका आम्ही हरतो, कोणीच अजय नाहीयेत. तरीही आमचा निवडून येण्याचा रेड हा इतरांपेक्षा चांगला आहे. याचं कारण मोदींजीवर लोकांचा विश्वास आहे. कधी, कधी स्थानिक ठिकाणी अशाप्रकारच्या अडचणी तयार होतात की, ज्यामुळे एखादी निवडणूक हरावी लागते. त्याचं विश्लेषण होईल.’

कर्नाटक विधानसभा निवडणुकीवर राज ठाकरेंची प्रतिक्रिया….

‘मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की, विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका, हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा,’ असं बोलत राज ठाकरेंनी भाजपला टोला लगावला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.