Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही – अजित पवार

149
Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही - अजित पवार
Ajit Pawar : नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही - अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत आज मंगळवार ४ जुलैला मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय देशाला पर्याय नाही असे अजित पवारांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

या बैठकीनंतर अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री अजित पवार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय आम्ही मार्गी लावले आहेत. विकासाच्या मुद्द्यांवर मी सरकारसोबत आलो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मी एकत्र काम केले आहे.

(हेही वाचा – Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसला किती आमदारांचा पाठिंबा? जयंत पाटील म्हणाले…)

तसेच देशपातळीवर नरेंद्र मोदींशिवाय आज देशाला पर्याय नाही. देश त्यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच करत आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे. आम्ही एकत्रपणे काम करायचे ठरवले आहे. विकासाच्या मुद्द्यांवर मी सरकारसोबत आलो आहे. असेही अजित पवार म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.