DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले – अजित पवार

पुण्यातील पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नाही

106
DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले - अजित पवार
DCM Ajit Pawar : मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले - अजित पवार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. या कार्यक्रमावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आमच्यात कोणतेही कोल्ड वॉर नाही. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचे काम चांगले आहे. एका खुर्चीवर दोघांचे डोळे कसे असणार?, असा प्रश्नही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला.

याप्रसंगी बोलताना पवार म्हणाले की, पुण्यातील पालकमंत्री पदावरून कोणताही वाद नाही. पुण्यातील ध्वजारोहण प्रत्येक वर्षी राज्यपाल करतात, असेही ते म्हणाले. नितीन गडकरी यांनी पुण्यातील रस्त्यासांठी ४० हजार कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. आमचं गडकरी आणि फडणवीस या दोघांवरही प्रेम आहे. सर्वांच्या मदतीने लवकरच पुण्यातील रिंग रोडचा प्रश्न सुटणार आहे. तसेच दोन महानगरांमध्ये मेट्रोचे जाळेही वाढवायचे आहे.

(हेही वाचा – Nitin Gadkari : पुण्याला मोकळा श्वास घेऊ द्या, नितीन गडकरींचे आवाहन)

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील रस्त्याचे लोकार्पण पार पडले. आज पुण्यातील ८६५ कोटी रुपये किंमतीच्या एनडीए चौक (चांदणी चौक) प्रकल्प व रस्त्याच्या कामाचे लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ऑनलाइन उपस्थिती), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार भीमराव तापकीर, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, उपस्थित होते. यानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यावेळी सकाळी रुबी हॉल ते वनाझ दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे मेट्रोने प्रवास करुन प्रवासी नागरिकांशी संवाद साधला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.