किशोरी पेडणेकरांची पुन्हा चौकशी होणार; सोमय्यांनी केले ‘हे’ आरोप

112

एसआरए प्रकरणी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर अडचणी सापडल्या आहेत. शुक्रवारी दादर पोलीस स्थानकात किशोरी पेडणेकर यांची १५ मिनिटे चौकशी झाली आहे. त्यांनी शनिवारी पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ही माहिती किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत दिली आहे.

( हेही वाचा : गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट; बचाव पथकातील ७ पोलिसांसह ३० जण गंभीर जखमी)

किरीट सोमय्यांनी केले ट्वीट करत आरोप 

किरीट सोमय्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, किशोरी पेडणेकरांना पुन्हा दादर पोलीस स्टेशनला यावे लागणार आहे. दादर पोलीस स्टेशन १२ एसआरए फ्लॅट्सच्या फसव्या विक्री प्रकरणी चौकशी सुरू आहे तर किश कॉर्पोरेट कंपनी विरुद्ध मरीन लाईन्स पोलीस स्टेशनची चौकशी सुरू आहे. या कंपनीला महापालिकेचे कंत्राट कोविडमध्ये मिळाले होते. यासंदर्भातील याचिका दाखल केल्याचेही सोमय्यांनी ट्वीटमध्ये नमूद केले आहे.

एसआरए फ्लॅट देण्याच्या नावाखाली दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी चौघांवर अटकेची कारवाई झालेली आहे. या चौकशीतून किशोरी पेडणेकर यांचे नाव पुढे आले होते. पेडणेकरांची शुक्रवारी चौकशी झाल्यावर त्यांना पुन्हा शनिवारी चौकशीसाठी बोलावलं आहे.

यावर आता किशोरी पेडणेकरांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. एका सामान्य महिलेला त्रास दिला जात असल्याचा आरोप पेडणेकर यांनी सोमय्यांवर केला आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असेही त्या म्हणाल्या.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.