D. K. Shivakumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

135
D. K. Shivakumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
D. K. Shivakumar: कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्याविरोधात २० एप्रिल रोजी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या लोकांना मतांच्या बदल्यात पाणी देण्याच्या आश्वासन दिल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे, अशी माहिती कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. (D. K. Shivakumar)

(हेही वाचा –Eknath Shinde: वादळ, वारा, पाऊस अशा सर्व संकटांसमोर महायुती खंबीरपणे उभी राहील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास)

निवडणूक अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून शिवकुमार (D. K. Shivakumar) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती दिली आहे. बंगळुरूच्या आरएमसी यार्ड पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बंगळुरू ग्रामीण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचे भाऊ डी. के. सुरेश (D. K. Suresh) हे काँग्रेसकडून (Congress) निवडणूक लढवत आहेत. (D. K. Shivakumar)

(हेही वाचा –Chandrasekhar Bawankule: “उद्धव ठाकरे पिसाळले…”, फडणवीसांवर केलेल्या टीकेला बावनकुळेंचा पलटवार)

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये ते एका सोसायटीतील लोकांना त्यांच्याकडे एक प्रस्ताव असल्याचं सांगत आहेत. जर तिथल्या सोसायटीत राहणाऱ्या लोकांची ६ हजार ४२४ मतं त्यांच्या उमेदवाराला मिळाली तर त्या सोसायटीची पाण्याची समस्या ते तीन महिन्यात सोडवतील असं आश्वासन डी. के. शिवकुमार (D. K. Shivakumar) यांनी मतदारांना देताना दिसत आहेत. (D. K. Shivakumar)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.