PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींवर टीका; भाजपची राहुल गांधी, खरगेंच्या विरोधात निवडणूक आयोगात तक्रार

85

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विश्वचषक सामन्यातील अंतिम सामना भारत हरल्यानंतर राहुल गांधी यांनी ‘आमचे खेळाडू चांगले विश्वकरंडक जिंकत होते, पण पनवतीने हरविले’,असे विधान केले. या विधानाला आक्षेप घेत भाजपने बुधवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. राजस्थानमधील जालौर येथे जाहीर सभेत बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचावर टीका केली होती. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेनंतर सोशल मीडियावर ‘पनवती’ हा शब्द चांगलाच व्हायरल झाला होता.

मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात आयोगात तक्रार

राहुल गांधी हताश तर झाले आहेतच, पण त्यांचे वक्तव्य म्हणजे त्यांच्या मानसिक अस्थिरतेचे लक्षण आहे,’ अशी टीका भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. रवीशंकर प्रसाद यांनीही काँग्रेसवर टीका केली. ‘नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे गुजरातचे मुख्यमंत्री असताना मोदी यांच्या जातीचा समावेश ओबीसी प्रवर्गात करण्यात आला होता,’ या विधानाबद्दल भाजपने काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याविरोधात आयोगात तक्रार केली आहे. भाजप नेते राधामोहन अग्रवाल आणि ओम पाठक यांनी ही तक्रार दाखल केली. मोदी (PM Narendra Modi) यांच्या जातीचा समावेश १९९९ साली ओबीसी प्रवर्गात करण्यात आला होता. तर मोदी २००१ साली गुजरातचे मुख्यमंत्री झाले होते. असे असताना खोटी माहिती देऊन खरगे यांनी लोकांची दिशाभूल केली आहे, असे भाजपने आयोगाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचा Chandrashekhar Bawankule : छायाचित्र काढून माझ्या बदनामीचा प्रयत्न; चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.