Governor Ramesh Bais : ‘मेड बाय इंडियंस’ अशी ओळख निर्माण करा

भारत हा जगातील सर्वाधिक युवा असलेला देश आहे.

135
Governor Ramesh Bais : 'मेड बाय इंडियंस' अशी ओळख निर्माण करा
Governor Ramesh Bais : 'मेड बाय इंडियंस' अशी ओळख निर्माण करा

जपान व जर्मनी येथे नोकरी करण्यासाठी संधी मिळालेले आयटीआयचे विद्यार्थी स्वतःच्या उत्कृष्ट आणि गुणवत्ता पूर्ण कामगिरीने आपल्या देशाची एक वेगळी ओळख करून देतील, ‘मेड इन जर्मनी’ आणि ‘मेड इन जापान’ हे शब्द जसे त्यांच्या गुणवत्ता पूर्ण उत्पादन आणि सेवांची ओळख करून देतात त्याच प्रकारे आपली देखील ‘मेड बाय इंडियंस’ अशी ओळख निर्माण करा असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी बुधवार, ०६ सप्टेंबर रोजी केले. सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी (MSSDS) अंतर्गत ‘महाराष्ट्र इंटरनॅशनल’ या आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उद्घाटन आणि परदेशात रोजगार प्राप्त आयटीआय मधील ५८ विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात राज्यपाल रमेश बैस यांनी आवाहन केले.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीचे आयुक्त रामास्वामी एन., व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, कौशल्य विकास विद्यापीठाच्या कुलगुरू अपूर्वा पालकर, ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन, जर्मनी, दक्षिण आफ्रिका, युनायटेड किंगडम, यूएसए, दक्षिण कोरिया, थायलंड आणि इतर प्रमुख देशांचे वाणिज्य दूत या समारंभाला उपस्थित होते.

राज्यपाल म्हणाले, जर्मनी आणि जपान येथे परदेशात नोकरी करण्यासाठी निवड झालेल्या सर्व आयटीआय विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो. याबद्दल मी जर्मनी आणि जपान वाणिज्य दुतांचेही खास आभार मानतो. महाराष्ट्राला अत्यंत उत्कृष्ट असे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे नेतृत्व लाभले असून विभागाच्या माध्यमातून किमान १००० आयटीआय मध्ये ९० पेक्षा अधिक विविध ट्रेड शिकवले जातात आणि दरवर्षी अडीच लाख युवांना या माध्यमातून कौशल्य विकास केला जातो ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

भारत हा जगातील सर्वाधिक युवा असलेला देश आहे. भारतात सर्वाधिक २९ वर्ष वयोगटातील तरुणांची संख्या आहे. हे भारतासाठी एक बलस्थान आहे. परदेशात कुशल मनुष्यबळाची वाढते मागणी लक्षात घेता आपण तशा प्रकारे कुशल मनुष्यबळ तयार केले पाहिजे. कोणतेही काम छोटे अथवा मोठे नसते. यासाठी श्रमाला एक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम आपल्याला केलं पाहिजे. महाराष्ट्र शासन खाजगी आणि सरकारी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करत आहे हे अत्यंत चांगली गोष्ट आहे, अशी प्रशंशाही त्यांनी केली. आजचे युग हे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञान वापरण्याचे युग आहे. या प्रकारचे नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून युवा पिढी एकापेक्षा अधिक कौशल्य विकास प्राप्त करू शकतो. युवा पिढीने एकापेक्षा अधिक परदेशी भाषां शिकल्या पाहिजेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्किल, रिस्कील आणि स्किल या संकल्पनांना प्रोत्साहन दिलेले आहे, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.

(हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाआड येणारी २८ बांधकामे हटवली)

३५०० विद्यार्थ्यांना परदेशी रोजगार उपलब्ध करून देणार…..

कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, जपान, जर्मनी या प्रगत देशांच्या कुशल मनुष्यबळाची गरज ओळखून आज आपल्या राज्यातील युवकांना आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी या सुविधा केंद्र मार्फत लाभ होणार आहे. राज्यात पाच ठिकाणी या सुविधा केंद्राच्या शाखा स्थापन करण्यात येतील. आंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देता येतील, असे ठोस आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत आहेत. हीच २७ देशांशी रोजगारासाठी आम्ही सामंजस्य करार करणार आहोत आणि साधारण ३५०० विद्यार्थ्यांना परदेशी रोजगार उपलब्ध करून देण्याचे आमचे ध्येय आहे. या सुविधा केंद्राच्या माध्यामातून अतिशय कमी खर्चात आपल्या युवकांना परदेशी जाता येईल. आज जगभरात अनेक देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करत आहेत.रोजगाराची समस्या जगभर आहे त्यामुळे मी महाराष्ट्रातील इतर देशांच्या राजदूतांना विनंती करतो की आमच्या या प्रयत्नांनाना त्यांनी सहकार्य करावे असे आवाहनही मंत्री लोढा यांनी केले. प्राथमिक स्वरूपात जर्मनी व जपान येथे नोकरीसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालयाचे दिगंबर दळवी यांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.