- जयेश मेस्त्री
मुंबईत सध्या मराठी विरुद्ध परप्रांतीय असं वातावरण निर्माण करण्यात आलं आहे. मात्र यामध्ये एक गोष्ट दुर्लक्षित राहिली आहे, ती म्हणजे तेलंगणा राज्याच्या हैदराबाद शहरात निर्माण झालेल्या एमआयएम या पक्षाने महाराष्ट्रातील पालिका निवडणुकीत मुसंडी मारली आहे. त्यांना महाराष्ट्रभरात सुमारे १२१ जागा मिळाल्या आहेत. मुंबईत त्यांना ८ जागा मिळाल्या आहेत. मनसे (MNS) हा पक्ष मराठीचे कैवारी असल्याचा भासवत असला तरी मराठी मुसलमानांनी (राज ठाकरेंच्या दृष्टीकोनातून) ओवैसी या परप्रांतीयाला पसंती दिली आहे.
सर्वात आधी आपण ‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (MIM)’ या शब्दाचा अर्थ जाणून घेऊ. अखिल भारतीय मुस्लिम एकता संघ म्हणजेच भारतातील मुस्लिमांचे संघटन म्हणजे भारतातील मुस्लिमानांना एकत्र करणारा पक्ष असा याचा अर्थ आहे. त्यामुळे या पक्षाच्या नावतच स्पष्ट आहे की हा पक्ष केवळ मुस्लिमांचा आहे, मुस्लिमांच्या हितासाठी काम करणारा आहे व त्यांचं संघटन घडवून आणण्यासाठी झटत आहे. (Corporation Election)
(हेही वाचा – AIMIM चे हिरवे फुत्कार सुरूच; आता वारीस पठाण म्हणाले, आम्ही केवळ महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाला हिरवे करू…)
याआधी मुस्लिम लीग या पक्षाने भारतीय मुस्लिमांना संघटित केले होते. याचे गंभीर परिणाम डायरेक्ट अॅक्शन म्हणजेच हिंदुंची कत्तल व बालात्कार आणि रक्तरंजित फाळणीच्या रुपात भोगावे लागले. असदुद्दिन ओवैसी यांचे बंधू अकबरुद्दिन ओवैसी (Akbaruddin Owaisi) यांनी हिंदुंना संपवण्याची भाषा केली होती. ‘तुम्ही १०० कोटी आहात ना, आम्ही २५ कोटी आहोत ना. मग १५ मिनिटांसाठी पोलिस हटवा. मग बघू कोणात किती दम आहे.’ त्यांचं हे विधान प्रचंड चर्चेत आलं होतं. असदुद्दिन ओवैसी (Asaduddin Owaisi) हे वकील आहेत. अत्यंत संयत भाषेत ते आपली भूमिका मांडतात. पहलगाम हल्ल्याचाही त्यांनी निषेध केला होता. मात्र त्यांची सार्वजनिक भूमिका वेगळी आणि वैयक्तिक भूमिका वेगळी आहे का? असा संभ्रम त्यांच्या बंधूंच्या विधानावरुन निर्माण होतो. मुंब्रा येथे एमआयएमने सर्व चार नगरसेवक निवडून आणले. हिंदूंना आपला शत्रू मानून कार्य करणारे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांना त्यांच्याच वैचारिक बंधूंनी पराभूत केले. अतिरेकी इश्रत जहाची बाजू घेण्यापासून सेव्ह गाझापर्यंत आव्हाडांनी मुस्लिम समाजाची बाजू धरुन ठेवली. मात्र आता पुढच्या निवडणुकीत त्यांचा गड शाबूत राहतोय की त्यांना पराभवाचा सामना करावा लागतोय, हे पाहावे लागेल. (Corporation Election)
सहर शेख (Sahar Shaikh) या नवनिर्वाचित नगरसेविका सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या वडिलांनी निवडणुकीपूर्वी आव्हाडांवर तीव्र टीका केली होती. अगदी त्यांच्या पक्षाचे चिन्ह तुतारी यावरही कंबरेखालची टीका केली. तुतारीची मुतारी असं म्हणत त्यांनी आव्हाडांना आव्हान दिलं आणि त्यांच्या उमेदवारांचा पराभवही केला. एमआयएम देशभरात आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आधी त्यांना महाराष्ट्रात फारसा प्रतिसाद लाभला नव्हता. कारण मुसलमान समाज राजकीयदृष्ट्या अत्यंत जागरुक आहे. कॉंग्रेस आणि त्या संस्कृतीतील पक्षाने मुस्लिमांचे व्यवस्थित लाड पुरवले. पण आता कॉंग्रेस हा पक्ष तितका मजबूत राहिला नाही. महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर मुसलमान समाजाने उद्धव ठाकरेंना एकगठ्ठा मते दिली होती. मात्र आघाडी तुटली. उद्धव ठाकरेंनी मामू फॅक्टर म्हणजेच मराठी-मुसलमान फॅक्टरवर निवडणूक लढवली पण त्यांना यश आले नाही. याचं कारण मुसलमानबहुल भागात राहणाऱ्या मुसलमान समाजाने एमआयएम हा पर्याय शोधला आहे. मुसलमानांना आता कॉंग्रेस आणि त्या संस्कृतीतल्या पक्षांवर विश्वास राहिलेला नाही. कदाचित भविष्यात पश्चिम बंगालचीही परिस्थिती वेगळी असू शकते. असिदुद्दिन ओवैसी यांनी अत्यंत संयत शब्दात आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. आपण संविधानप्रेमी आहोत हे भासवण्यात त्यांना यशही आले आहे. मुसलमानांधील सुधारणांवरही ते बोलतात. मात्र प्रत्यक्षात सुधारणावादी कामे होताना दिसत नाहीत. त्यात सहर शेख यांनी मुंब्रा हिरवा करायची, या लोकांना पळवून लावायची भाषा केली आहे. त्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी प्रतिक्रियाही दिली आहे. त्यांच्या पक्षाच्या झेंड्याचा रंग हिरवा असल्याने त्यांनी असे विधान केल्याचे म्हटले आहे. पण सहर शेख यांचे विधान स्वतंत्रपणे पाहू नये. या विधानाचा संबंध अकबरुद्दिन ओवैसी यांच्या विधानाशी असू शकतो. १५ मिनिटांत पोलिस हटवा ही धमकी त्यांनी दिली होती. आता मुंब्रा येथील नवतरुणी मुंब्रा हिरवा करण्याची भाषा करतेय. हे दोन्ही विधान एकत्र केले की आपल्याला मुस्लिम लीगच्या डायरेक्ट अॅक्शनची आठवण येते. त्यामुळे एमआयएमचा उदय हा धोका नसून अकबरुद्दिन ओवैसी आणि सहर शेख यांच्या विधानातील सुप्त हेतू हा धोका आहे. (Corporation Election)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

