NDA : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांची समन्वय समिती

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे ठरले आहे.

137
NDA : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांची समन्वय समिती
NDA : प्रत्येक लोकसभा मतदारसंघात एनडीएतील घटक पक्षांची समन्वय समिती

आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघावर पूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे ठरले आहे. त्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समन्वयासाठी एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांची सर्वसमावेशक समन्वय समिती तयार करण्याचा निर्णय मंगळवारी (१२ सप्टेंबर) घेण्यात आल्याची माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली.

महायुतीमधील तीनही घटक पक्षांच्या समन्वय समितीची बैठक मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी झाली. याबाबत माहिती देताना शेलार म्हणाले की, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानुसार ही बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बंगल्यावर झाली.

विशेष करून आगामी लोकसभेच्या निवडणुकीचा पूर्ण विचार करताना राज्यांमध्ये ४८ लोकसभा क्षेत्रांवर पूर्ण लक्ष केंद्रित करून ४५ च्या वर जागा निवडून येण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरी काही दिवसापूर्वी झालेल्या बैठकीत जे ठरले होते. ते विषय पुढे नेण्यासाठी, निर्णय करणे अपेक्षित होते, यासाठी लोकसभा निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी समन्वय समितीबरोबर अन्य नेत्यांवर असेलच, पण त्याबरोबर प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये समन्वय करण्यासाठी या तिन्ही पक्षांबरोबर एनडीएतील अन्य घटक पक्ष या सगळ्यांबरोबरची एक समन्वय समिती सर्वसमावेशक सर्वव्यापी या पद्धतीने लोकसभा क्षेत्रात करण्याचा आज निर्णय झाला. त्यासाठी नावाचा विचार झाला. अंतिम निर्णय तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते करतील, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

(हेही वाचा – CM Eknath Shinde : लंडनमधील संपत्ती बाहेर काढू; मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा)

विधानसभा निवडणूक एकत्र लढणार

या बरोबरीने २८८ विधानसभा क्षेत्रामध्ये आम्ही घटक पक्षांबरोबर निवडणुकांचा विचार करत आहोत. त्यामध्ये सुद्धा एक विधानसभा क्षेत्र, एक सर्वव्यापी टीम अशी कोअर ग्रुप प्रत्येक विधानसभानुसार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होत असून महायुतीचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्याबाबतीतील चर्चा पूर्ण झाली. विधिमंडळामध्ये सुद्धा ज्या विविध समित्या असतात आणि या सर्व विधान परिषदेच्या आणि विधानसभेच्या समित्यांच्या बाबतीत सुद्धा त्याबद्दल आवश्यक नावे आवश्यक कोटा आणि आवश्यक विभागणी याच्यावर एकमत झाले. तोही निर्णय काही दिवसात घोषित होईल. एकंदरीत नियमितपणे एकत्रित निर्णय करण्याच्या प्रक्रियेला चांगली गती या बैठकीनंतर मिळाली. तिन्ही पक्षांची महायुतीतील अन्य घटक पक्षांबरोबर चर्चेला गती मिळाली याचाही आम्हाला आनंद आहे, असे शेलार यांनी सांगितले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.