Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून उबाठा-काँग्रेसमध्ये घमासान

आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात चांगलीच जुंपली असून भविष्यात घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

202
Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून उबाठा-काँग्रेसमध्ये घमासान
Lok Sabha Election 2024 : जागावाटपावरून उबाठा-काँग्रेसमध्ये घमासान

आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणुकीच्या जागा वाटपावरून महाविकास (Mahavikas) आघाडीतील ठाकरे Thackeray) गट आणि काँग्रेस (Congress) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. महाविकास आघाडीत जागा वाटपावरून अजिबात वाद नाहीत, असे छातीठोकपणे सांगणारे संजय राऊत (Sanjay Raut) तोंडघशी पडणार का, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका बाजूला वंचित बहुजन आघाडीला जवळ करणाऱ्या उबाठा गटाला (UBT group) वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी (Sharad Pawar group), उबाठा गट (UBT group) आणि वंचितला प्रत्येकी १२ जागा वाटण्यात याव्यात अशी मागणी करून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी उडवली आहे. त्यातच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उबाठा गट (UBT group) २३ जागा लढवेल असे भाष्य केल्यावर काँग्रेसने (Congress) तलवार उपसली आहे. परिणामी भविष्यात महाविकास आघाडीत घमासान होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

गल्लीतील नेत्यांनी यावर बोलू नये

उबाठा (UBT) गटाच्या संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभेच्या (Lok Sabha) २३ जागा लढवणार असल्याचे जाहीर करून, त्यावर ठाम असल्याचा पुनरुच्चार केला. याबाबत बोलताना त्यांनी गल्लीतील नेत्यांनी यावर बोलू नये, असा टोला राऊत यांनी लगावला. आम्ही दिल्लीतील नेत्यांशी चर्चा करत असल्याचे सांगून राज्यातील काँग्रेस नेत्यांना त्यांची जागा दाखविली. (Lok Sabha Election 2024)

आम्ही कुठे लढायचं?

यावर प्रतिक्रिया देताना, अनेक महिने विजनवासात असलेले काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी उबाठा गटावर (UBT group) टीका केली. ते म्हणाले, “ठाकरे गट २३ जागा मागत आहे. या खूपच जास्त आहेत. ते जर ४८ पैकी २३ जागा लढवणार असतील तर आम्ही कुठे लढायचं?” सगळेच अशी मागणी करू लागले तर वादविवाद वाढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Lok Sabha Election 2024)

उबाठाकडे मते किती आहेत?

उबाठा गटाकडे (UBT group) आता नेते नाहीत, कार्यकर्ते नाहीत आणि मतेही नाहीत, अशी अप्रत्यक्ष टीका करताना निरुपम म्हणाले, “जागा वाटपाचा निर्णय सहज सोपा नाही. उबाठा गटाकडे (UBT group) मते किती आहेत? आमच्याकडे मते पण आहेत नेते पण आहेत कार्यकर्तेही आहेत हे सर्वांना माहीत आहे.” (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा – Mantralaya : मंत्रालयात ‘इयर एण्ड मूड’; अधिकारी-कर्मचारी नसल्याने पूर्णतः शुकशुकाट)

हे कोण?

एकेकाळचे सहकारी असलेल्या निरुपम यांच्यावर जहरी टीका करताना उबाठा गटाचे (UBT group) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी निरुपम यांना प्रत्युत्तर देताना, “हे कोण आहेत?” असा सवाल केला. “आपले दिल्लीतील नेत्यांशी ठरले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील किंवा मुंबईतील कोण काय बोलत असतील तर त्याकडे फार गांभीर्याने बघण्याची गरज नाही,” असा टोला राऊत यांनी लगावला. (Lok Sabha Election 2024)

काँग्रेस नेत्यांकडून प्रखर विरोध

दरम्यान काल गुरुवारी नागपूर येथील सभेनंतर राज्यातील काँग्रेसचे नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण दिल्लीला रवाना झाले. आज शुक्रवारी लोकसभेच्या जागा वाटपाबाबत दिल्लीत बैठक होणार आहे. यात उबाठा गटाच्या २३ जागांच्या मागणीला राज्यातील काँग्रेस नेत्यांकडून प्रखर विरोध केला जाण्याची शक्यता आहे. (Lok Sabha Election 2024)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.