‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’, कालीचरण महाराज वादाच्या भोवऱ्यात

90

गेल्या काही दिवसांपूर्वी अकोल्यातल्या पुरातन शिवमंदीरात एका कालीचरण नावाच्या महाराजानं शिवतांडव स्तोत्र म्हटलं आणि ते जगप्रसिद्ध झाले. ‘शिवतांडव स्तोत्र’ म्हणणाऱ्या या महाराजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या तरुण महाराजाचा आवाज, त्याची स्टाईल पाहून त्याच्या नावाची चांगलीच चर्चा झाली. इतकेच नाही तर अनुपम खेरसारख्या अभिनेत्याने त्यांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. मात्र आता हा महाराज एखाद्या स्तोत्रामुळे नाही, तर शिवीगाळ केल्याने चर्चेत आला आहे. ही शिवीगाळ त्यांनी कोणा एका भक्ताला किंवा सहकाऱ्याला केली नाही राष्ट्रपिता म्हटल्या जाणाऱ्या महात्मा गांधी यांना केली आहे.

काय आहे नेमकं प्रकरण

कालीचरण महाराज यांनी जगजाहीरपणे व्यासपीठावरून धर्मसंसदेत राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी यांना अपशब्द वापरल्याचे समोर आले आहे. हाच व्हिडिओ धुमाकूळ घालत असून यामुळे कालीचरण महाराज सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या व्हायरल व्हिडिओमध्ये कालीचरण महाराजानं गांधींना अपशब्द वापरताना नथूराम गोडसेचे आभार मानले. त्याच्या कृतीचं देखील अभिनंदन केलं आहे. देशभरात सध्या विविध ठिकाणी धर्मसंसदेचं आयोजन केलं जात असून त्यातली छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्येही या धर्मसंसदेचे आयोजन करण्यात आले होता. त्यामध्ये कालीचरण महाराजानं असे वादग्रस्त विधान केले आहे. या विधानामुळे कालीचरण महाराज अडचणीत आले असून काँग्रेसच नाही तर अनेक सामाजिक, राजकीय व्यक्तींकडून कालीचरण महाराजाविरोधात देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी केली जात आहे.

फाळणीचा इतिहास बघता, देशाचा सत्यानाश झाला या विधानाला कोरोडो लोकांचं देशांतर आणि २० लाखं लोकांचा बळी गेला त्यांची प्रेतं ही साक्षीदार आहे. मी अजिबात गांधी हत्येचं समर्थन करत नाही उलट गांधी हत्येचा फायदा घेऊन हिंदू सभांवर सरकारने बंदी आणली आहे, हा इतिहास आहे. काँग्रेसचे सरकार नालायक होते, त्यावेळी त्यांनी गांधींना कोणतेही संरक्षण दिले नाही, तर त्यांची हत्या होऊ दिली आणि हिंदू सभा संपवली. नथुराम गोडसे यांनी त्यांच्या निवेदनात गांधींची हत्या का केली हे सांगितले आहे. हा वैयक्तिक विषय आहे. ज्यावेळी वीर सावरकरांवर टीका होते, तेव्हा लोकशाहीचे दाखले देऊन मत-मतांतराचा अधिकार असल्याचे सांगितले जाते. त्यांनी हा युक्तिवाद खोडून काढवा, त्यांनी फाळणीचा अभ्यास करून त्याची उत्तरे द्यावी, अशी प्रतिक्रिया

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष, वीर सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांनी दिली.

(हेही वाचा – पैठणमध्ये ५३ ख्रिश्चन बांधवांचा धर्म त्याग, स्वीकारला हिंदू धर्म!)

बघा व्हिडिओ

हे भगवे वस्त्र पांघरलेला भ्रष्ट उघडपणे महात्मा गांधींना शिव्या घालत आहेत, याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. गांधीजींशी कोणाचे वैचारिक मतभेद असू शकतात, पण त्यांचा अपमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही. हा अक्षम्य गुन्हा आहे, असे माजी खासदार संजय निरूपम यांनी ट्वीट केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.