Sanjay Shirsat : आता काँग्रेसचे आमदारही फुटणार? संजय शिरसाट यांनी दिले संकेत 

78

राज्यात आधी शिवसेना फुटली, त्यानंतर आता राष्ट्रवादीचा एक गट सरकारमध्ये सहभागी झाला आहे. आणखी एक पक्ष लवकरच फुटणार आहे, तो म्हणजे काँग्रेस. काँग्रेसचे घर फुटणार आहे, हे मी वारंवार सांगत आहे.  आता त्यांच्याकडचे कोण कोण येतंय? याकडे आमचे लक्ष असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांनी केला.

पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी हा दावा केल्याने खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे काही आमदार, नेते सरकारमध्ये आले तरी आम्हाला काही अडचण नाही, नाराजी नाही. आमच्या सगळ्यांची जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारलेली आहे, असेही शिरसाट म्हणाले.

(हेही वाचा Eknath Shinde : ‘सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून…’ काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?)

मंत्रिमंडळ विस्तारात 14 जणांना स्थान

संजय शिरसाट म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लांबला असला तरी तो होणारच आहे. अधिवेशन झाल्यानंतर 14 आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करून त्यांना खाते वाटप केले जाणार असल्याचा दावा देखील शिरसाट यांनी केला. मंत्रिमंडळ विस्तार होणार आणि सगळ्यांना न्याय मिळणार. कधीकधी ठरलेल्या वेळेत गोष्टी होत नाहीत, राजकारणात अनेक निर्णय बदलावे लागतात, योग्यवेळ आली की ते घेतले जातात.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.