Paris Olympic 2024 : मुष्टीयोद्धा अमित पनघलला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा 

Paris Olympic 2024 : ऑलिम्पिक पात्रता मिळवणारा अमित हा एकमेव पुरुष मुष्टीयोद्धा ठरला आहे 

75
Paris Olympic 2024 : मुष्टीयोद्धा अमित पनघलला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा 
Paris Olympic 2024 : मुष्टीयोद्धा अमित पनघलला पॅरिस ऑलिम्पिकचा कोटा 
  • ऋजुता लुकतुके 

बँकॉक इथं झालेली ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) पात्रता स्पर्धा जिंकून भारताचा अमित पनघल (Amit Panghal) पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला आहे. तो ५१ किलो वजनी गटात भारताचं प्रतिनिधित्व करेल. अमितने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य जिंकलं आहे. आणि आता तो पॅरिसमध्ये खेळणारा भारताचा एकमेव पुरुष मुष्टीयोद्धा असणार आहे. त्यासाठी पात्रता स्पर्धेत अंतिम फेरीत त्याने चीनच्या चाँग लिऊचा ५-० असा पराभव केला. हा सामना सरळ गेममध्ये संपलेला दिसत असला तरी प्रत्यक्ष लढत चुरशीची झाली. (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Pune Porsche Car Accident : पुण्याच्या पोर्स अपघातानंतर मुंबई पोलिसांकडून बार, पबबाहेर पडणाऱ्यांची तपासणी)

अमितने लिऊवर जोरदार ठोसे लगावले. पण, लिऊही चांगलं प्रत्युत्तर देत होता. शेवटच्या तीन फेऱ्यांमध्ये तर चेहऱ्याच्या जवळ येत त्याने जोरदार आक्रमण केलं. पण, अमितनेही आपला आक्रमक बाणा कायम ठेवत गुण कमावणं सुरू ठेवलं. आणि त्यामुळे तो विजय मिळवू शकला.  (Paris Olympic 2024)

टोकयो ऑलिम्पिक (Paris Olympic 2024) खेळल्यानंतर अमित एकमेव मोठी स्पर्धा खेळला होता ती, राष्ट्रकूल स्पर्धा. आणि यात त्याने सुवर्ण जिंकलं असलं, तरी आंतरराष्ट्रीय स्तरावर तो फारसा खेळला नव्हता. त्यामुळे भारतीय मुष्टीयुद्ध संघटनेनं यंदाच्या पात्रता स्पर्धांमध्ये अमित ऐवजी दीपक भोरिया या त्याच्या राष्ट्रीय प्रतिस्पर्ध्याला संधी दिली. पण, अमितने हार मानली नाही. पात्रतेची शेवटची संधी असताना स्पर्धा जिंकून त्याने पॅरिसचं तिकीट मिळवलं आहे.  (Paris Olympic 2024)

(हेही वाचा- Pimpari Chinchwad Fire: काळेवाडीत गोदामाला आग )

आता अमित निखत झरिन (Amit Nikhat Zarin), प्रीती पवार, निशिता देवी आणि लवलिन बोरगोहेन (Lovlin Borgohen) या चौघांसह भारताचं मुष्टियुद्ध प्रकारात प्रतिनिधित्व करेल. बँकॉकमधील स्पर्धेत जयमिन लँबोरिया आणि सचिन सिवाच या आणखी दोन भारतीय पुरुष मुष्टीयोद्धयांना पॅरिस पात्रतेची संधी आहे. दोघं ५७ किलो वजनी गटात खेळत आहेत. (Paris Olympic 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.