Congress Party: काँग्रेसला भविष्यात एकूण संपत्तीच्या तुलनेत दुप्पट कर भरावा लागण्याची शक्यता, आयकर विभागाची कारवाई

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ३१ मार्चपूर्वी उर्वरित मागणीची नोटीस बजावल्यास, काँग्रेसकडून वसूल करण्यात येणारी एकूण रक्कम २,५०० कोटी रुपयांच्याही वर पोहोचू शकते. यामुळे हे काँग्रेससाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.

100
Congress Party: काँग्रेसला भविष्यात एकूण संपत्तीच्या तुलनेत दुप्पट कर भरावा लागण्याची शक्यता, आयकर विभागाची कारवाई

आयकर विभागाकडून ५ आर्थिक वर्षांसाठी, तब्बल १,८२३ कोटी रुपये एवढा आयकर भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती काँग्रेस पक्षाने शुक्रवारी दिली. महत्त्वाचे म्हणजे, पक्षाला आणखी ३ मूल्यांकन वर्षांसाठी नोटीस बजावली जाऊ शकते. अशा परिस्थितीत आयकर विभागाकडून काँग्रेसला त्यांच्या एकूण संपत्तीच्या तुलनेत, जवळपास दुप्पट कर भरण्यास सांगितले जाऊ शकते. यामुळे काँग्रेसला भविष्यात मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो.

सूत्रांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने ३१ मार्चपूर्वी उर्वरित मागणीची नोटीस बजावल्यास, काँग्रेसकडून वसूल करण्यात येणारी एकूण रक्कम २,५०० कोटी रुपयांच्याही वर पोहोचू शकते. यामुळे हे काँग्रेससाठी आतापर्यंतचे सर्वात मोठे आव्हान ठरू शकते; कारण पक्षाची एकूण संपत्ती जवळपास १,४३० कोटी रुपये एवढी आहे, तर भरावयाच्या कराची रक्कम २,५०० कोटी रुपये होऊ शकते. मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी काँग्रेसने आपल्या आयटी रिटर्नमध्ये दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे जवळपास ६५७ कोटी रुपयांचा निधी आहे, ३४० कोटी रुपयांची निव्वळ मालमत्ता आणि ३८८ कोटी रुपये रोख आणि रोख समतुल्य – एकूण सुमारे १,४३० कोटी रुपये आहेत.

(हेही वाचा –  IPL 2024 : हा आहे पहिल्या आठवड्यातील आयपीएल XI संघ)

काँग्रेसचं दिवाळं निघेल 
काँग्रेस दिवाळखोर झाली तरीही त्यांना २,५०० कोटी रुपये भरता येणार नाही; कारण ही रक्कम काँग्रेसच्या नेटवर्कच्या तुलनेत खूप जास्त आहे. आयकर विभाग वसुली प्रक्रिया थांबविण्यासाठी एकूण रकमेच्या २० टक्के रक्कम भरण्याचा पर्याय देते. महत्वाचे म्हणजे, काँग्रेस पक्षाला ७ वर्षांच्या रिटर्नच्या पुनर्मूल्यांकनासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयाकडून कसल्याही प्रकारचा दिलासा मिळालेला नाही. याच आठवड्याच्या सुरुवातीला त्यांच्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी
आयकर विभागाला रोखण्यासाठी आता काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. काँग्रेसला आतापर्यंत आर्थिक वर्ष १९९३-९४, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ आणि २०१९-२० साठी आईटी डिमांड नोटिस मिळाली आहे. २०१८-१९ साठी सर्वात मोठी म्हणजेच ९१८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे, आगामी काळात आर्थिक वर्ष २०१४-१५, २०१५-१६ आणि २०२०-२१ साठी आयकर विभाग काँग्रेसला आणखी ३ नोटीस जारी करण्याच्या तयारीत आहे. आयकर विभागाने ही संपूर्ण कारवाई २०१९ मध्ये दोन कॉर्पोरेट्सवर टाकलेल्या छाप्यांदरम्यान मिळालेल्या तथ्‍यांच्या आधारे करण्यात येत आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.