Congress : आमच्या पुरेशा जागा नाही, आम्ही लढणार नाही – काँग्रेसची माघार

124
Congress : आमच्या पुरेशा जागा नाही, आम्ही लढणार नाही - काँग्रेसची माघार
Congress : आमच्या पुरेशा जागा नाही, आम्ही लढणार नाही - काँग्रेसची माघार

गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळल्यानंतर काँग्रेससाठी आणखी एक वाईट बातमी आहे. काँग्रेसने राज्यसभेची निवडणूक लढण्यापासून पळ काढला आहे. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उदासिनता पसरली आहे.

सविस्तर वृत्त असे की, निवडणूक आयोगाने गुजरातमधून राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक जाहीर केली आहे. निवडणूक २४ जुलै रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १३ जुलै, तर अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख १७ जुलै आहे. आणि २४ जुलै रोजी मतदान होणार आहे. गुजरातमध्ये राज्यसभेच्या एकूण ११ जागा आहेत. यापैकी आठ जागा भाजपकडे आणि तीन जागा काँग्रेसकडे आहेत. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, जुगलजी ठाकूर आणि दिनेश अनावडिया यांचा कार्यकाळ १८ ऑगस्ट रोजी संपणार आहे. या तीन जागांसाठी ही निवडणूक होणे आहे. मात्र, भाजपने अद्याप उमेदवारांची घोषणा केलेली नाही.

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ११३ वर्षांपूर्वी मारलेल्या जगप्रसिद्ध उडीचे भगूर येथे स्मरण

दरम्यान, तीन जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष आपला उमेदवार उभा करणार नसल्याची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे. उमेदवार निवडून आणण्यासाठी पाहिजे तेवढे आमदार आपल्याकडे नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला चांगले आकडे मिळू शकले नाहीत, असे गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मनीष दोशी यांनी शुक्रवारी सांगितले. त्यामुळेच आम्ही आगामी राज्यसभा निवडणूक लढवणार नसल्याचा निर्णय घेतला आहे. आपले उमेदवार उभे करणार नाहीत.

२०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. दुसरीकडे, गुजरात अस्तित्वात आल्यापासून काँग्रेसची कामगिरी सर्वात वाईट आहे. भाजपने विधानसभेच्या १८२ पैकी १५६ जागा जिंकल्या. तर काँग्रेसला केवळ १७ जागांवरच विजय मिळविता आला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.