राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना मिळणार ५० लाखांचे बक्षिस – महाजन

105

राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ केली आहे. या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना मिळणार ५० लाखांचे बक्षिस दिले जाणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी दिली.

( हेही वाचा : उद्धव ठाकरे यांनी आता ‘एमआयएम’सोबत जाणे बाकी; भाजपची बोचरी टीका)

मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर कक्षात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाजन म्हणाले, पंजाब, हरियाणा राज्यांत खेळाडूंना प्रोत्साहनासाठी देण्यात येणाऱ्या बक्षिस रकमेच्या तुलनेत राज्याची रक्कम कमी होती. ती जवळपास ५ पट वाढविण्यात आली आहे. पूर्वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंना १० लाख रुपये देण्यात येत होते. आता ती रक्कम ५० लाख रुपये करण्यात आली आहे. रौप्यपदक विजेत्या खेळाडूंसाठी ७.५० लाख रुपये ऐवजी ३० लाख रुपये करण्यात आली आहे. तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंना ५ लाख रुपयांऐवजी २० लाख रुपये देण्यात येणार आहेत.

त्याशिवाय खेळाडूंच्या मार्गदर्शकांच्या बक्षिसांची रक्कमही वाढविण्यात आली आहे. सुवर्णपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकासाठी १२.५० लाख रुपये, रौप्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना ७.५० लाख रुपये, तर कांस्यपदक विजेत्या खेळाडूंच्या मार्गदर्शकांना ५ लाख रुपये बक्षिस देण्यात येणार आहेत.

राज्यातील खेळाडूंना ८ पदके

बर्मिंगहम येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एकूण १४ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यापैकी राज्यातील ७ खेळाडूंनी ८ पदके प्राप्त केली आहेत. या खेळाडूंसह त्यांच्या मार्गदर्शकांना ३.५० कोटी रुपये बक्षिस देण्यात येणार आहे. यामध्ये सुनिल शेट्टी याने टेबल टेनिसमध्ये (पुरुष सांघिक) सुवर्णपदक, चिराग शेट्टी याने बॅडमिंटनमध्ये (पुरुष दुहेरी) सुवर्णपदक आणि मिश्र सांघिक खेळामध्ये रौप्यपदक, स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रिग्स, राधा यादव यांनी क्रिकेटमध्ये (महिला संघ) रौप्यपदक, संकेत महादेव सरगर वेटलिफ्टिंग (पुरुष 55 कि.ग्रॅ.) रौप्यपदक, अविनाश साबळे ॲथलेटिक्स (3 हजार मिटर स्टिपलचेस) रौप्यपदक प्राप्त केले आहे, असेही महाजन यांनी यावेळी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.