जे. जे. रुग्णालयात नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

एन. डी. स्टुडिओत नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील

95
जे. जे. रुग्णालयात नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन
जे. जे. रुग्णालयात नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन

प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (४ ऑगस्ट) सकाळी जे. जे. रुग्णालयात जाऊन दर्शन घेतले. त्यांच्यासह मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढाही उपस्थित होते. यावेळी रुग्णालयालच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि फॉरेन्सिक मेडिसिन विभागप्रमुख डॉ. गजानन चव्हाण आदी अधिकारी उपस्थित होते.

New Project 2023 08 04T120843.429

बुधवार २ ऑगस्ट रोजी कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेनंतर रात्री उशिरा खालापूर पोलिसांनी नितीन देसाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जे. जे. रुग्णालयात आणला. गुरुवारी सकाळपर्यंत नितीन देसाई यांच्यावर शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाली. मात्र, त्यांचे पार्थिव जे. जेतील शवागृहातच ठेवण्याची देसाई कुटुंबीयांनी जे. जे. रुग्णालय प्रशासनाला विनंती केली. देसाई यांची दोन्ही मुले परदेशात राहतात. ते दोघेही परतल्यानंतर नितीन देसाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती मिळाली आहे. कर्जत येथील एन. डी. स्टुडिओत नितीन देसाई यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.

(हेही वाचा – Mental Disorder : मानसिक आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!)

नितीन देसाई यांच्यावर २५२ कोटी रुपयांचे कर्ज होते. या कर्जाची थकबाकी राहिल्याने देसाई यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. याबद्दल कुटुंबीयांकडून अद्यापही कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.