Mental Disorder : मानसिक आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

मानसिक तणावात असलेल्या प्रत्येकाला समजून घ्या

154
Mental Disorder : मानसिक आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!
Mental Disorder : मानसिक आजाराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन देसाई (Nitin Desai) यांनी कर्जा (loan) च्या वाढत्या व्यापाला कंटाळून तर केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरने जीवघेणे इंजेक्शन टोचून आत्महत्या केली. या घटनेनंतर मानसिक तणावात (mental stress) असलेल्या प्रत्येकाला समजून घ्या, डिप्रेशनच्या (Depression) रुग्णांची लक्षणे ओळखून त्यांना वेळीच मानसोपचारतज्ञाकडे (Psychiatrist) उपचारासाठी आणा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.

मानसिक तणावात (mental stress) असलेला माणूस व्यक्त होण्यासाठी उत्सुक असेल तर त्याला प्रियजनांनी वेळ देणे गरजेचे आहे. सतत एकटे राहणाऱ्या माणसांच्या सानिध्यात राहा. त्यांच्या मनात नकारात्मक विचार (negative thoughts) येत असतील तर हे मानसिक रुग्ण डिप्रेशनच्या (Depression) वळणावर जात असल्याचे वेळीच ओळखा असे आवाहन मनसोपचारतज्ञांनी केले आहे.

(हेही वाचा – Ganesh Idols : यावर्षी गणेश मूर्ती ३० टक्क्यांनी महाग होण्याची शक्यता)

डिप्रेशनची लक्षणे – 

  • शांत चेहरा.
  • संभाषण टाळणे.
  • सतत झोपून राहणे.
  • घराबाहेर जाणे टाळणे.
  • घराबाहेर असल्यास सार्वजनिक समूह टाळत एकटे राहणे पसंत करणे.
  • जगण्याची इच्छा नसणे.

इतर मानसिक आजाराची लक्षणे – 

  • सतत दुःखी असणे, घाबरणे.
  • अनियंत्रित राग येणे.
  • सतत भीतीच्या गर्तेत किंवा तणावत राहणे.
  • नकारात्मक ऊर्जेत राहणे.
  • आभासी जगात वावरणे.
  • पॅनिक अटॅक येणे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.